Navi Mumbai Airport  Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Airport : खुशखबर! २०२५ मध्ये नवी मुंबई विमानतळावरून होणार पहिलं उड्डाण

Navi Mumbai Airport Start : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम साठ टक्के काम पूर्ण झालं आहे. २०२५ मध्ये नवी मुंबई विमानतळावरून पहिलं उड्डाण होणार असल्याची माहिती मिळतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Navi Mumbai Airport Starting Date

मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विविध ठिकाणे रस्ते आणि रेल्वे विकासाची प्रकल्प पूर्ण झालेली आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचं काम पूर्ण करण्यात आलंय. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (NMIAPL) अदानी समूहाद्वारे बांधलं जात आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत व्यावसायिक कामकाज सुरू करणार आहे. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत चाचणी उड्डाणे अपेक्षित आहेत. (latest marathi news)

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घोषणा केली की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai Airport), एक महत्त्वाचा राष्ट्रीय पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. तो मार्च २०२५ पर्यंत व्यावसायिकरित्या कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या विमानतळामध्ये रस्ते, रेल्वे, यासह मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी असेल, असंही ते म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१९ हजार ६०० करोडचा ग्रीनफिल्ड प्रकल्प

हा एक (Navi Mumbai Airport)१९ हजार ६०० करोडचा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. विमानतळाची सुरूवातीच्या टप्प्यात दोन कोटी प्रवासी क्षमता असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. गती शक्ती योजनेंतर्गत मल्टिमॉडल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनचा संदर्भ देत सिंधिया म्हणाले की, या विमानतळामध्ये रस्ते, रेल्वे आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी तसेच जल कनेक्टिव्हिटीच्या भविष्यातील योजना असतील.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ((Navi Mumbai Airport) हे देशातील पहिले विमानतळ असेल, ज्यामध्ये १६०० हेक्टरमध्ये स्वयंचलित प्रवासी वाहतूक शहराच्या १० किलोमीटरपर्यंत असेल. हे १०० टक्के ग्रीन विमानतळ तयार केलं जात असल्याचं त्यांनी पुढे म्हटलं आहे.

प्रकल्पाचे पाच टप्पे पूर्ण

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी अदानी समूहाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह ग्रुप फायनान्सचे उपाध्यक्ष जीत अदानी यांची विमानतळाचा आढावा घेण्यासाठी भेट घेतली. त्यांनी जाहीर केलंय की, प्रकल्पांच (Airport) काम जवळपास ५५ ते ६० टक्के पूर्ण झालंय. NMIAPL ची मूळ संस्था अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जने यापूर्वी जाहीर केलेली प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख डिसेंबर २०२४ होती. ही तारिख तीन महिन्यांनी पुढे सरकली आहे, असंही ते म्हणाले.

प्रकल्पाचे पाचही टप्पे पूर्ण झाल्यावर विमानतळाला (Navi Mumbai Airport) चार टर्मिनल आणि दोन धावपट्टी असतील, असंही ते म्हणाले. विमानतळावर रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जल कनेक्टिव्हिटी असेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT