पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप दौरा केल्यानंतर मालदीव आणि भारताच्या वादानंतर लक्षद्वीपचं पर्यटन वाढलंय. अनेकांनी लक्षद्वीपला जाण्याचे प्लॅन केले आहेत. MakeMyTrip सारख्या ट्रॅव्हल एग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर बुकिंगसाठी मोठ्या संख्येने लोक ट्रॅव्हल पॅकेजेस शोधू लागले आहेत. (Latest News)
दरम्यान इतक्या ट्रेंडमध्ये असल्यानंतर आणि चक्क पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) येथील निसर्गाचं कौतुक केल्यानंतर तुमच्या डोक्यात 'अब तो जाना पडेगा!, मुझको जाना पड़ेगा' हे डॉयलॉग आले असतीलच नाही का ! जर तुम्हीही लक्षद्वीपला (Lakshadweep) जाण्याचा प्लान करत असाल तर तेथे जाण्यासाठी काय खर्च येईल आणि तेते कसं जाता येईल, काय खर्च असेल याची माहिती करून घेणं आवश्यक आहे. ही बातमी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कसं जाणार आणि किती वेळ लागेल
भारताच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीवरुन लक्षद्वीप हे २०० ते ४४० किमी दूर आहे. लक्षद्वीप हा एकूण ३६ लहान लहान बेटांचा समूह आहे. येथे जाण्यासाठी केवळ दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे हवाईमार्ग आणि दुसरा जलमार्ग.आगत्ती बेट हे लक्षद्वीपमधील सर्वात प्रसिद्ध बेट असून येथे विमानतळ (Airport) बांधण्यात आले आहे. येथे जाण्यासाठी तुम्हाला दिल्लीहून विमान मिळेल. हा विमानाचा (flight) प्रवास तुम्हाला दिल्ली ते अगाटी बेटापर्यंत करावा लागेल.
त्यासाठी तुम्हाला १२ ते २५ तास लागू शकतात, हे मार्गावरील थांब्यांच्या संख्येवर अवलंबून आहे. दरम्यान तुम्ही मुंबई ते अगात्ती असादेखील तुम्ही विमान प्रवास करू शकता. हा प्रवास साधारणपणे १० ते ११ तासांचा आहे. मुंबई ते कोची आणि कोची ते लक्षद्वीप,असा देखील प्रवास करता येईल. यासाठी मुंबई ते कोची हा प्रवास साधारणपणे दोन ते सव्वा दोन तासांचा आहे आणि कोची ते लक्षद्वीप हा प्रवास साधारणपणे १ ते दीड तासांचा आहे. त्यामुळे एकूण ५ ते ६ तासांचा हा प्रवास होईल.
जलमार्ग
या बेटावर जाण्यासाठी जलमार्ग हाही एक पर्याय आहे. त्यासाठी तुम्हाला कोचीपर्यंत प्रवास करावा लागेल. कोचीपासून लक्षद्वीपपर्यंत तुम्ही जहाजाने प्रवास करु शकता. यामध्ये तुम्हाला क्रूजचा देखील पर्याय आहे. या प्रवासासाठी तुम्हाला जवळपास १४ ते २० तास लागू शकतात.
लक्षद्वीपला भेट देण्याचा योग्य काळ
बेट असल्यामुळे वर्षाचे बाराही महिने लक्षद्वीपचं वातावरण अल्हाददायक असतं. पण ऑक्टोबर ते मार्च हा काळ लक्षद्वीपला भेट देण्यासाठी फार चांगला काळ.
लक्षद्वीप ट्रीपसाठी लागणार खर्च
लक्षद्वीपला तुम्ही तुमची स्वत: देखील ट्रीप प्लॅन करत आहात जर तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल तर मुंबई ते लक्षद्वीप विमानाचे तिकीट १० हजार रुपये असू शकतं. जर तुम्ही कोचीवरुन जाणार असाल तर कोची ते लक्षद्वीप विमानाचे तिकीट हे ३ ते साडेतीन हजारांच्या आसपास आहे. त्यानंतरचा प्रवास बोटीने कराल तर त्याचा खर्च हा २ ते अडीच हजारांच्या घरात जाऊ शकतो. हॉटेल बुकींगचा खर्च देखील १५०० रुपयांच्या किमान किंमतींपासून सुरु होतो.
त्यामुळे तुम्ही साधारणपणे ३० ते ३५ हजारांमध्ये लक्षद्वीप फिरून येऊ शकतात. यासाठी टूर पॅकेजचा देखील पर्याय उपलब्ध आहे. ४ दिवस आणि ४ रात्रीच्या पॅकेजसाठी २३ हजारांपासून सुरुवात होते. पण यामधील काही पॅकेज तुम्हाला लक्षद्वीपमध्ये पोहचल्यानंतर सुविधा देतात. तर काही पॅकेजमध्ये तुम्हाला कोची ते लक्षद्वीप सुविधा देतात. त्यामुळे कोचीपर्यंतचा प्रवास तुम्हाला करावी लागेल.
परवानगी आवश्यक
१९६७ मध्ये लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमिनदिवी बेटांसाठी काही अटी व नियम निश्चित करण्यात आले होत. त्यानुसार जे लोक या ठिकाणी राहत नाहीत त्यांना प्रवेश आणि राहण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. प्रवेश परवानगी फॉर्म ऑनलाइन भरून प्रशासकाकडे जमा करावा लागतो. १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी १०० रुपये आणि १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी २०० रुपये अतिरिक्त शुल्कासह अर्जासाठी एका अर्जदार ५० रुपये रुपये फी भरावी लागेल.
भारतातील इतर ठिकाणांहून येणाऱ्या लोकांना त्यांच्या संबंधित जिल्ह्याच्या पोलीस आयुक्तांकडून पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र अनिवार्य असतं. अर्जदारांना ओळखपत्राच्या ३ पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह स्वयं-साक्षांकित छायाप्रती देखील द्याव्या लागतात. तुम्ही येथे जाणार असाल तर तुम्हाला ePermit पोर्टल https://epermit.utl.gov.in/pages/signup वरून हा अर्ज करावा लागेल.
MakeMyTrip
MakeMyTrip द्वारे प्रोमो कोडद्वारे १०% पर्यंत सूट देतेय. यामुळे १२,००० रुपयांचे तिकीट जवळपास १०,००० रुपयांपर्यंत कमी होणार आहे.हे फक्त पहिल्या फ्लाइट बुकिंगवर उपलब्ध आहे. याशिवाय, किमान ३प्रवाशांसाठी तिकीट बुक केल्यास बोनस कूपनद्वारे २,५०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.