Navi Mumbai Link Road Saam Tv
मुंबई/पुणे

Link Road: नवी मुंबईत १४ किमीचा नवा लिंक रोड, एक्सप्रेसवे अन् JNP हाकेच्या अंतरावर येणार, वाचा सविस्तर

Navi Mumbai Kalamboli Link Road to Connect JNP And Expressway: जेएनपी आणि मुंबई बडोदा एक्सप्रेसवेला जोडण्यासाठी नवीन १४ किमीचा रोड बांधण्यात येणार आहे. यामुळे तुमचा प्रवास खूप सुखकर होणार आहे.

Siddhi Hande

जेनपीए आणि मुंबई बडोदा एक्सप्रेसवे जोडण्यासाठी नवीन रस्ता

मोरबे ते कळंबोळीमार्गे तळोजापर्यंत १४ किमीचा रस्ता बांधणार

विरार अलिबाग कॉरिडॉरवरील विलंबामुळे नवीन रस्ता बांधणार

मुंबई बडोदा एक्सप्रेसवेवर अजून एक नवीन रस्ता बांधण्याची योजना आहे. थेट जवाहरलाल नेहरु बंदराशी (जेएनपीए) वाहनांना जोडण्यासाठी नवीन १४ किलोमीटरचा रस्ता बांधण्याची योजना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. हा नवीन रस्ता मोरबे ते कळंबोळीमार्गे तळोपर्यंत जाणार आहे. विरार अलिबाग कॉरिडॉरवरील विलंबामुळे एनएचआयने हे काम सुरु केले आहे.

मोरबे ते कळंबोळीमार्गे तळोजापर्यंत नवीन रस्ता

तलासरी ते मोरबेपर्यंत रस्ता बांधला जात आहे. याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. हा रस्ता बदलापूरजवळील मोरबे येथून जाऊन माथेरानला थांबणार आहे. जिथे एनएचआयने एक बोगदा खोदला आहे. त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता पुढे जेएनपीएपर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विरार- अलिबाग कॉरिडॉरअंतर्गत २१ किलोमीटरचा रस्ता बांधण्याची योजना आहे. एमएसआरडीसीला हे काम पूर्ण करण्यासाठी विलंब होत आहे. यामुळे प्रकल्प रखडला आहे. म्हणूनच एनएचआयने आता एमएसआरडीसीवर अवलंबून न राहता हा १४ किमीचा रस्ता बांधण्याच्या प्रकल्पास सुरुवात केली आहे.

प्रकल्प नेमका आहे तरी काय? (Morbe-Kalamboli 14km Link Road)

MSRDC ने मोरबे ते करंजाळे असा २१ किमी रस्ता अलिबागपर्यंत बांधण्याची योजना आखली आहे. दरम्यान, यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे NHAI ने करंजाळेऐवजी कंळबोळीपर्यंत रस्ता बांधण्याची योजना आखली आहे. हा रस्ता दोन ते तीन किमी लांब असणार आहे. मोरबे ते तळोजा येथील बोगद्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना या रस्त्याची आवश्यकता असणार आहे. हा रस्ता एमआयडीसीला जोडला जाईल.त्यामुळेच १४ किमी लांब रस्ता बांधण्यापेक्षा एनएचआयने एमआयडीसीतील रस्त्याला मंजुरी दिली आहे. यामुळे या संपूर्ण रस्त्याचा खर्च १०० कोटींपर्यंत जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लोकल प्रवास होणार गर्दी मुक्त, आता १८ डब्यांची उपनगरीय रेल्वे धावणार

Maharashtra Live News Update: १० दिवसांत भाजपला सोडचिठ्ठी, माजी आमदार नितीन भोसले यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश

BMC Election : आयोगाचा भाजपला जोरदार धक्का, ऐन निवडणुकीत परवानगी नाकारली

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹३००० ऐवजी ₹१५०० आले, आता डिसेंबरचा हप्ता का रखडला? महत्त्वाची माहिती समोर

Tilgul Poli Recipe : मकर संक्रांतीला फक्त १० मिनिटांत बनवा मऊसूत 'तीळ गुळाची पोळी', वाचा पारंपरिक रेसिपी

SCROLL FOR NEXT