Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या राष्ट्रीय कार्यकारिणी; शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार

आज संध्याकाळी राष्ट्रवादीच्या ॲाफीस बेयररची बैठक होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत ताल कटोरा स्टेडियम येथे उद्या पार पडणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार, खासदार आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. शिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचे सर्व प्रदेश पदाधिकारी व शहर-जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी आज संध्याकाळी राष्ट्रवादीच्या ॲाफीस बेयररची बैठक होणार आहे.

हे देखील पाहा -

राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप संपला नाही आहे. राष्ट्रीय स्तरावर शरद पवारांना युपीएचे चेअरमन करण्याची मागणी वारंवार केली जाते. त्यातच नितीश कुमार विरोधकांचा चेहरा म्हणून पुढे येत आहेत. शरद पवार आणि नितीश कुमारांची नुकतीच भेट झाली. त्यामुळेराष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिशा स्पष्ट होणार आहे.

ईडी सीबीआयकडून चौकशांचा ससेमीरा सुरूच आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक अद्याप जेलमध्ये आहेत तर आता प्रफुल्ल पटेल यांच्या घरावर धाडी पडल्या आहेत. यावरून केंद्रीय तपास यंत्रणेच्या गैरवापरावरही कार्यकारिणीच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडून भूमिका मांडली जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balasaheb Thorat: विशाल पाटील यांना मदत केली, भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली; शिवसेनेची मागितली माफी

Malaika Arora: ८ तास झोप, दारुला बाय बाय... मलायकाचा नोव्हेंबरचा फिटनेस प्लान पाहिलात का?

Sajiri Deshpande: अभिनेता अमेय वाघची पत्नी कोण? कलाविश्वापासून दूर, या क्षेत्रात आहे कार्यरत

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Maharashtra Election : नागपुरात घबाड सापडले, पोलिसांनी तब्बल दीड कोटी जप्त केले

SCROLL FOR NEXT