Video: सर्वांची माफी माग नाही तर तुला...; नवनीत राणांना पोलीस पत्नीचा इशारा

पोलीस ठाण्यात राडा घातल्याने पोलीस कुटुंब संतप्त...
Amravati News
Amravati NewsSaam Tv
Published On

अमर घटारे

अमरावती - शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात लव्ह जिहाद झाल्याचा आरोप करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालत पोलिसांशी जोरदार बाचाबाची करून राडा घातलेला होता, त्यानंतर अमरावतीत पोलीस कुटुंब चांगलेच आक्रमक झाले आहे, शिवसेना (Shivsena) पदाधिकारी व पोलीस पत्नी वर्षा भोयर यांचा एक बाईट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. यात त्यांनी नवनीत राणा यांना सणसणीत इशारा देत माफी मागण्यच आव्हान केलं आहे.

नवनीत राणा तुला शेवटची संधी देते. तुला खरच माणुसकी असेल ना तर सर्व पोलिसांची जाहीरपणे माफी माग नाही तर तुला मी सोडणार नाही...तू पोलिसांच्या काळजाला हात घातलेला आहे. रात्रभर कोरोना काळामध्ये पोलिसांनी कर्तव्य पार पाडलं.. तुला पोलिसांचे दुःख नाही कळणार पोलिसांबद्दल अपशब्द तू नेहमीच वापरते..असा इशारा पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी दिला आहे.

Amravati News
Gokul Milk Price |गोकुळ दूध खरेदी दरात पुन्हा वाढ! शेतकऱ्यांना दिलासा, किती रुपयांनी महागलं दूध?

काय आहे लव्ह जिहाद प्रकरण?

अमरावतीत एका मुलीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्याचा प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलं तापलं होतं. हिंदू तरुणीचे अपहरण करून तिचा आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर या मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला होता. प्रकरण समोर येताच खासदार नवनीत राणा, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, खासदार अनिल बोंडें यांच्यासह हिंदू संघटनांनी लव्ह जिहाद झाल्याचा आरोप केला होता.

इतकंच नाही तर, खासदार नवनीत राणा यांनी या बेपत्ता मुलीवरून पोलीस ठाण्यात २० मिनिटं जोरदार राडा केला होता. जर बेपत्ता झालेली तरुणी सापडली नाही तर, आंदोलन करू असा इशारा देखील राणा यांनी पोलिसांना दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका सोहेल शहा नामक तरुणाला ताब्यात घेतलं होतं. पोलिस त्याची कसून चौकशी करीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com