Gokul Milk Price
Gokul Milk PriceSaam Tv

Gokul Milk Price |गोकुळ दूध खरेदी दरात पुन्हा वाढ! शेतकऱ्यांना दिलासा, किती रुपयांनी महागलं दूध?

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाने दूध खरेदी दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.
Published on

कोल्हापूर: कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाने दूध खरेदी दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. या दरवाढीचा फायदा दूध (Milk) उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. गायीच्या दूध खरेदीमध्ये गोकुळने एक रुपयाची वाढ केली आहे, तर ही दरवाढ ११ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.(Gokul Milk Price)

Gokul Milk Price
हरियाणात मोठी दुर्घटना! गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून ६ जणांचा मृत्यू; अनेकांना रुग्णालयात केले दाखल

गोकुळ दूध संघातील संचालक मंडळाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत ही दरवाढ करण्याचा निर्णय झाला. याअगोदर दूध (Milk) दरवाढ झाली होती, त्यावेळी, जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या चाऱ्याच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे दुधाचे दर वाढवण्यात आले असल्याचे सांगितले होते. ही दरवाढ ऑगस्टमध्ये करण्यात आली होती.

हे देखील पाहा

Gokul Milk Price
Mumbai: लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत ५० मोबाईलसह अनेकांचे दागिने लंपास; पोलिस स्टेशनसमोर भक्तांची रांग

या अगोदर अमुलने १८ ऑगस्ट रोजी दरवाढ केली होती. डिझेल, पॅकिंगचा कच्चा माल आणि विजेच्या दरवाढीमुळे अमूलने दुधाच्या दरात वाढ केली होती असल्याचं सांगितले होते. म्हैस आणि गाईच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटरला सरसकट २ रुपये वाढ करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com