WOMAN KILLED IN TRUCK-BIKE COLLISION ON RC PATIL BRIDGE, EKNATH SHINDE STOPS CONVOY TO ASSIST Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू; उपमुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून केली पाहणी

Nashik Mumbai Highway Accident News : नाशिक-मुंबई महामार्गावरील आर.सी. पाटील पुलावर ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी.

Alisha Khedekar

  • नाशिक-मुंबई महामार्गावरील आर.सी. पाटील पुलावर भीषण अपघात

  • अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी

  • जखमीला तातडीने भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी केली पाहणी

फैय्याज शेख, नाशिक

Mumbai Nashik Expressway Accident News नाशिक-मुंबई महामार्गावरील आर.सी. पाटील पुलावर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून एक दाम्पत्य भिवंडीकडून ठाण्याच्या दिशेने प्रवास करत होते. ते आर.सी. पाटील पुलाजवळ पोहोचले असता त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. धडकेचा जोर इतका होता की दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली. दुर्दैवाने ती ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी दुचाकीस्वाराला प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी येथे दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भिवंडीतील साया गार्डन परिसरातून ठाण्याकडे जात असताना त्यांना हा अपघात दिसला. त्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवून घटनास्थळी पाहणी केली. तसेच जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. ॲम्बुलन्स तातडीने घटनास्थळी पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. या अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. मृत महिलेची ओळख पटवण्याचे आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. ट्रक चालकाची चौकशी करण्यात येत असून या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fat Loss: पोटावर चरबीचे टायर आलेत? मग उद्या सकाळपासून १ ग्लास पाण्यात प्या हा पदार्थ

Bad cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठलीये? हे 6 डिंक्स खेचून बाहेर काढतील वाईट कोलेस्ट्रॉल

Maharashtra News Live Update: परभणीत दाखल होताचा खासदार संजय जाधव यांना मिळणार Y+ सुरक्षा

Shocking : रस्त्याअभावी रुग्णवाहिका पोहोचली नाही, गर्भवती महिलेचा वाटेतच मृत्यू; चंद्रपूरमधील भयंकर वास्तव

Shaniwar Wada : पेशव्यांच्या वाड्याला ‘शनिवार वाडा’ हे नाव कसे मिळाले? कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

SCROLL FOR NEXT