"मोदींना लोकं निवडून देतात, हा दावा म्हणजे या देशातील लोकशाही संपवायची आहे का?" Saam Tv
मुंबई/पुणे

"मोदींना लोकं निवडून देतात, हा दावा म्हणजे या देशातील लोकशाही संपवायची आहे का?"

या देशात हिटलरसारखी परिस्थिती निर्माण करुन सगळे नियम, घटना बदलून स्वतःकडे सर्व अधिकार घ्यायचे आहे का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे,

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: मोदींना (Narendra Modi) लोकं निवडून देतात हा दावा म्हणजे या देशातील लोकशाही संपवायची आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. या देशात हिटलरसारखी परिस्थिती निर्माण करुन सगळे नियम, घटना बदलून स्वतःकडे सर्व अधिकार घ्यायचे आहे का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

पाच राज्यात निवडणूका होणार असून या निवडणूकांच्या माध्यमातून भाजपची किती शक्ती राहिली आहे. किती लोकं पसंती देतात हे स्पष्ट होईल असे सांगतानाच ५० वर्ष आम्हीच राहू याचा अर्थ लोकशाही संपवायची आहे परंतु जनता त्यांना लोकशाही संपवू देणार नाही असे नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले आहे.

हे देखील पहा-

हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य बोलून भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व कमी करण्याचा खेळ खेळत आहेत;

हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य बोलून भाजप (BJP) छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व कमी करण्याचा खेळ खेळत आहेत. हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य या शब्दाचा अर्थ भाजपला कळत नाहीय असं बोलून भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व कमी करण्याचा खेळ खेळत आहेत असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी या शब्दाचा अर्थ भाजपच्या लोकांनी शब्दकोशात तपासून पहावा असेही नवाब मलिक म्हणाले.

हिंदूवी या शब्दाचा खेळ भाजपने खेळू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मदारी मेहत्तर तोफखान्याचे सरदार होते. व इतर प्रमुख दलाचे लोक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या आधारावर कधीही राजकारण केलेलं नाही. मात्र भाजपचे लोक चुकीचा इतिहास काही लोकांना पुढे करुन या देशाचा इतिहास बदलून छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबतीत गैरसमज निर्माण करत आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

केंद्रसरकारने एकतर्फी कुठलाही निर्णय जैतापूरवासियांवर लादू नये;

बळजबरीने कोणताही प्रकल्प होऊ शकत नाही. स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही विकास होत नाही आणि अशक्यही आहे त्यामुळे केंद्रसरकारने एकतर्फी कुठलाही निर्णय लादू नये असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राबवणार असल्याची माहिती संसदेत देण्यात आली त्यावर नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पूर्वीच्या सरकारने प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लोकांचा विरोध असल्याने तो प्रकल्प पुढे गेला नाही. जोपर्यंत लोकांचा विश्वास संपादीत होत नाही, लोकांची शंका दूर होत नाही तोपर्यंत कुठलाही प्रकल्प करणे योग्य नाही असे केंद्रसरकारला कळवले जाईल असेही नवाब मलिक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT