मुंबई/पुणे

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

Narayan Rane on raj thackeray : 'उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरे श्रेष्ठ आहेत. त्यांनी प्रचार केल्यानंतर उमेदवार जिंकतो, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

Vishal Gangurde

सूरज मसुरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : भाजप नेते नारायण राणे यंदा लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमवणार आहेत. या लोकसभा मतदारसंघात त्यांनी प्रचार सुरु केला आहे. या मतदारसंघात त्यांना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचं आव्हान असणार आहे. मात्र, 'उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरे श्रेष्ठ आहेत. त्यांनी प्रचार केल्यानंतर उमेदवार जिंकतो, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी साम टीव्हीच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी राणे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. राणे यांनी यावेळी राज ठाकरेंचं भरपूर कौतुक केलं.

'राज ठाकरे माझे मित्र असून आमचे राजकारणापलीकडे आमचे संबध आहेत. त्यात मला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. मी त्यांना विचारलं की कोकणात प्रचाराला येणार का? तर ते हो म्हणाले. कोणतंह राजकारण न करता ते आज कोकणात प्रचारात येत आहेत, असे राणे म्हणाले.

'आम्ही दोघे मित्र आहोत. शिवसेनेत असतानाही आम्ही एकत्र काम केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी खरं काम राज ठाकरेंनी केलं आहे. खरंतर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज श्रेष्ठ आहेत. त्यांच्या प्रचारामुळे उमेदवार जिंकतो, असा दावा राणेंनी केला.

'विनायक राऊत हे दोन वेळा मोदींमुळे निवडून आले आहेत. आता ते निवडून येतील का? त्यांनी काय काम केलं आहे? त्यांचं शून्य काम आहे, अशी टीका राणेंनी केली.

'उद्धव ठाकरे टीका करतात. ते पोलीस संरक्षण वैगरे घेऊन बडबड करतात. त्यांच्याकडे पाच खासदार आहेत. या निवडणुकीनंतर एकही खासदार येणार नाही. त्यांची ताकद किती? त्यांनी काहीतरी काम करुन दाखवावं, असं आव्हान राणेंनी दिलं.

'बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं. त्यांनी आता दुकान बंद करावं, आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्या भावना माझ्याबाजूने असत्या. त्यांचा माझ्यावर आणि माझ्या कामावर विश्वास आणि अभिमान होता. ही लढत होणार नसून मी एकहाती निवडून येईल, असाही दावा नारायण राणेंनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणातील निकाल वाचनाला सुरुवात

Monsoon Eye Care : डोळ्यांची जळजळ अन् लाल झालेत का? पावसाळ्यात अशी घ्या काळजी

MPSC FDA Recruitment: अन्न व औषध प्रशासनात नोकरीची संधी; पगार १३२३०० रुपये; MPSC द्वारे जाहीर केली भरती

Khalapur Toll Plaza : बनावट व्हीआयपी पास विकून लाखोंची कमाई; खालापूर टोल नाक्यावरील सिक्युरिटी गार्डचा गोरखधंदा उघड

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला आणखी एक मोठा झटका, टॅरिफनंतर ६ कंपन्यांवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT