Narayan Rane : 'यांंनी' दिली राणेंच्या बंगल्याची अधिकाऱ्यांना माहीती! Saam TV
मुंबई/पुणे

राणेंच्या अडचणीत वाढ; BMCची कारणे दाखवा नोटीस!

आदिश बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत पालिकेची नोटीस

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून कालच राणे पितापुत्रांची मालवणी पोलिसांकडून तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली होती. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) जुहू येथील आदिश बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत नोटीस राणेंना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. बंगल्यातील प्रत्येक मजल्यावर बेकायदा बदल करण्यात आल्याचे पालिकेच्या या नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे. आठ पैकी सात मजल्यावर पालिकेला बेकायदा बदल आढळले आहेत.

हे देखील पहा :

आदिश (Adish Bunglow) बंगल्यात बेकादायदा बांधकाम झाल्याबाबत तक्रार आल्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी या बंगल्याची पाहणी महापालिकेच्या इमारत प्रस्ताव आणि इमारत कारखाने विभागाच्या संयुक्त पथकाकडून करण्यात आली होती. या पथकात महापालिकेचे ९ अधिकारी होते व या पथकाने नारायण राणेंच्या बंगल्याची तब्बल २ तास पाहणी केली होती तसेच या बंगल्याचे मोजमाप देखील करण्यात आले होते. बांधकामात एफएसआयचे उल्लंघन झाल्याचे तसेच या पाहणीतून महानगरपालिकेने मंजूर केलेल्या आराखड्याची तुलना करुन इमारतीत बेकायदा बदल झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.

या नोटीस (Notice) अंतर्गत व निष्कर्षान्वये पालिका कायदा कलम ३५१, ३५२, ३५२ अ, ३५४ अ यानुसार कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच या बेकायदा बदलांबाबत ७ दिवसात उत्तर द्यावे असेही या नोटीसमध्ये नमूद आहे.

काय आहेत पालिकेचे निष्कर्ष?

तळघर, सर्विस एरिया, पार्किग एरियात बांधकाम करुन खोल्या तयार केल्या.

पहिला ते तीसरा मजला, गार्डन मध्ये खोली तयार करण्यात आली.

चौथा मजला - गच्चीवर खोलीचे बांधकाम

पाचवा मजला - गार्डन टेरेस मध्ये खोली बांधली.

सहावा मजला - पार्ट टेरेस मध्ये खोलीचे बांधकाम

आठवा मजला - पॉकेट टॅरेस आणि गार्डन टेरेस मध्ये बांधकाम

गच्ची-पॅसेज एरिया मध्ये बांधकाम

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांसाठी महत्त्वाचे बातमी, दोन नव्या मेट्रो स्थानकाला सरकारने दिली मंजुरी, वाचा सविस्तर

Dance Viral Video : लुक लुक डोळे अन् मोतुले कान; 'बाप्पा येणार येणार' गाण्यावर चिमुकल्यांचा जबरदस्त डान्स

बीडमध्ये घरगुती वाद टोकाला; भररस्त्यावर तरूणाच्या डोक्यात कोयता हाणला, मेंदूचा चेंदामेंदा झाला

War 2 VS Coolie : रजनीकांत यांच्या 'कुली'ची पहिल्या आठवड्यात छप्परफाड कमाई, 'वॉर 2' लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये पाऊण तास चर्चा

SCROLL FOR NEXT