Narayan Rane News Saam tv
मुंबई/पुणे

Narayan Rane English Video: महिला पत्रकाराने इंग्रजीत प्रश्न विचारला अन् नारायण राणे संतापले; नेमकं काय घडलं?

Narayan Rane News: कालच्या एका पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराच्या इंग्रजी प्रश्नाने राणे चांगलेच संतापलेले दिसले.

Vishal Gangurde

Narayan Rane Viral Video: केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. नारायण राणे त्यांच्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर त्यांच्या शैलीतून चौफेर प्रहार करताना दिसतात. राणे पत्रकार परिषदेत अनेकदा पत्रकारांना सौम्य भाषेत उत्तर देताना दिसतात. मात्र, कालच्या एका पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराच्या इंग्रजी प्रश्नाने राणे चांगलेच संतापलेले दिसले. या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं,पाहुयात. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यावर भाष्य केलं. या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एका महिला पत्रकाराने इंग्रजीत कोरोनामुळे डबघाईला आलेल्या लघू उद्यागोबद्दल प्रश्न विचारला. मात्र, महिला पत्रकाराने प्रश्न विचारताना हिंदी, इंग्रजी भाषा एकत्र केल्याने राणे चांगलेच संतापले .

राणे यांनी तातडीने मराठीतून प्रश्न विचारण्यास सांगितले. अर्ध इंग्लिश आणि अर्ध हिंदी... तुम्ही मराठी आहात ना, मग मराठीत बोला. मी तुम्हाला बऱ्याच वर्षापासून ओळखतो असेही राणे हे यावेळी महिला पत्रकाराला म्हटले.

नारायण राणे महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, 'कोरोना काळात बरेचशे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग बंद झाले. ते उद्योग पुन्हा सुरु व्हावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका योजनेच्या माध्यमातून पाच लक्ष कोटी रुपये आमच्या खात्याला दिले'.

'लोकांना कर्ज देण्यासाठी हे पैसे दिले आहेत. त्यातून आम्ही तीन लाख शहात्तर कोटी रुपये कर्ज देऊ केले आहे. कर्ज दिल्याने त्यांचे उद्योग आता सुरू झाले आहेत. कोरोनाच्या आधी उत्पन्न मिळत होतं. त्याच्यापेक्षा अधिक उत्पन्न आता त्यांना मिळत आहे, असेही राणे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT