Sharad Pawar Speech: संसद ही सर्वश्रेष्ठ! तिचा आदर न करणं लोकांना मान्य नाही - शरद पवार

Sharad Pawar Speech In Chhatrapati Sambhajinagar : पवार म्हणाले, संसद ही सर्वश्रेष्ठ आहे आणि तिलाच किंमत द्यायची नसेल तर लोकांना ते आवडणारे नाही. खरं म्हणजे नव्या वस्तूची गरज नव्हती.
Sharad Pawar Speech
Sharad Pawar Speechsaam tv
Published On

Chhatrapati Sambhajinagar News : संसद ही सर्वश्रेष्ठ आहे आणि तिलाच किंमत द्यायची नसेल तर लोकांना ते आवडणारे नाही असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

पवार म्हणाले, संसद ही सर्वश्रेष्ठ आहे आणि तिलाच किंमत द्यायची नसेल तर लोकांना ते आवडणारे नाही. खरं म्हणजे नव्या वस्तूची गरज नव्हती. संसदेने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. परंतु संवाद नसल्यानं हे घडलं. नवीन संसद बांधायचा निर्णय आम्ही पण वर्तमान पत्रात वाचला. हा निर्णय घेताना सुसंवाद साधला असता तर ते योग्य झालं असतं असेही पवार म्हणाले.

संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे - पवार

पुढे बोलताने ते म्हणाले की, ज्यावेळी संसदेची पहिली बैठक झाली, त्यावेळचा एक फोटो आहे. तो संसदेतला आहे. पण नव्या संसदेत मोदी आणि भगव्या कपड्याला साधुसंतांचा आहे. राज्यसभेचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत, त्यांनाही बोलवले नाही. त्यांना कोणी विचारले देखील नाही. जर त्यांना बोलावले असते तर प्रोटोकॉलनुसार इतरांना त्यांच्यानंतर जावे लागले असते. देशाच्या संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. जर आम्ही ठेवली नाही तर सामान्य माणसे यत्किंचितही ठेवणार नाहीत, असेही ते म्हणाले.

Sharad Pawar Speech
Manipur Clashes: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! बीएसएफचा एक जवान शहीद, तर आसाम रायफल्सचे 2 जवान जखमी

सध्या सर्व संस्था संकटाच्या स्थितीत - पवार

पवार म्हणाले, सध्या सर्व संस्था संकटाच्या स्थितीत आहेत. परंतु मला या देशातील सामान्य माणसांवर विश्वास आहे, ते शहाणे आहेत. आम्ही चुकीच्या मार्गाने गेलो तर ते पाहतात. आज केरळमध्ये भाजपचे राज्य नाही. तामिळनाडू, कर्नाटकमध्ये प्रचंड सत्ता संपतीचा वापर केलेला मी पाहिला. कर्नाटकातील निर्णय लोकांनी घेतला. गोव्यात भाजपचं सरकार नसताना काँग्रेसचे सरकार फोडून सत्ता आणली. महाराष्ट्रातही तेच केलं.

देशभरात लोकांनी शहाणपणाचे निर्णय घेतले - पवार

पवार म्हणाले, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशातही भाजप नाही, झारखंड, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल या राज्यात भाजपची सत्ता नाही. संपूर्ण देशाचं चित्र पाहिलं तर लोकांनी शहाणपनाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. फक्त जागरूक राहण्याची गरज आहे. चुकीच्या मार्गावर गेल्यास लोक शहाणपणाचा रास्ता दाखवतात. इंदिरा गांधींना देखील लोकांनी असाच रस्ता दाखवला आणि सत्ताबदल केली, असे पवार म्हणाले.

मुस्लिम समाज मागे राहिला - पवार

मुस्लिम आणि ख्रिश्चन यांची चिंता करावी अशी स्थिती आहे. देशात एकंदर चित्र पाहता जो समाज मागे राहिला आहे, तो समाज मुस्लिम आहे. हे दुर्लक्षित करण्यासारखे नाही. मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांसारखाच आहे, परंतु काही जण जाणीवपूर्वक काही गोष्टी समोर आणत आहेत आणि ते चिंताजनक आहे. आपण एक संघ राहिले पाहिजे. जर प्रसंग आला तर अशा विद्वेष घडवणाऱ्या लोकांविरोधात उभे राहिले पाहिजे, देश एकसंघ राहण्यासाठी आपण एकसंघ चांगल्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे पवार म्हणाले. (Latest Political News)

Sharad Pawar Speech
RPF Jawan Saves Passenger: ती देवदूतच! धावत्या रेल्वेतून खाली पडणाऱ्या महिला प्रवाशाचे वाचवले प्राण, घटना CCTV त कैद

"शिवाजी महाराजांचं राज्य भोसल्यांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही"

यावेळी बोलताना पवार म्हणाले, आजपासून 350 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. शिवाजी महाराजांचं राज्य भोसल्यांचं राज्य म्हणून कधी ओळखलं गेल नाही. छत्रपतीचं राज्य म्हणूनच ओळखलं गेलं. संसदीय लोकशाहीत अनेकांचं योगदान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचंही योगदान आहे. अलीकडच्या काळात संवाद कमी झालाय. संसदीय कामकाजात संवाद कमी झाल्याचे मी माझ्या पुस्तकात लिहिले आहे. पण मी यापूर्वी कधीही पाहिले नाही अशी स्थिती आहे. आज सुसंवाद नाही, कुणाचा विचारही केला जात नाही. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com