RPF Jawan Saves Passenger: ती देवदूतच! धावत्या रेल्वेतून खाली पडणाऱ्या महिला प्रवाशाचे वाचवले प्राण, घटना CCTV त कैद

RPF Jawan Saves Woman Passenger: मुंबईच्या वांद्रे टर्मिनसवरील फलाट क्रमांक दोनवरून संपर्क क्रांती एक्सप्रेस जात असताना एका महिलेने तिच्यासोबत असलेल्या बॅगसह धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला.
RPF jawan saves woman passenger
RPF jawan saves woman passengersaam tv
Published On

RPF Jawan Saves Woman Passenger Video: लोकल ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवेश करताना किंवा गाडीतून खाली उतरत असताना नागरिक अनेकदा घाई करतात आणि त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. रेल्वे स्थानकात प्रवाशांना काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या जातात. तरीही अनेक जण आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वेतून खाली उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करतात.

असाच एक प्रकार मुंबईच्या वांद्रे टर्मिनसमध्ये घडला आहे. धावत्या रेल्वेत बसण्याच्या प्रयत्नात महिलेचा तोल गेला आणि ति खाली पडली. परंतु आरपीएफच्या सतर्क महिला जवानाने या महिला प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

RPF jawan saves woman passenger
Maharashtra Politics: ॲड. प्रकाश आंबेडकरांचं भीमा कोरेगाव चौकशी आयोगास पत्र; फडणवीसांचा उल्लेख करत केली मोठी मागणी

ही घटना 31 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईच्या वांद्रे टर्मिनसवरील फलाट क्रमांक दोनवरून संपर्क क्रांती एक्सप्रेस जात असताना एका महिलेने तिच्यासोबत असलेल्या बॅगसह धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीत चढताना तिचा तोल गेला आणि ती रेल्वेच्या दरवाजातच खाली पडली. तेवढ्यात तिथे कर्तव्यावर असलेल्या आरपीएफच्या महिला जवानाने तिला सावरलं आणि खेचून फलाटावर घेतलं. (Breaking News)

RPF jawan saves woman passenger
Maharashtra Politics: ॲड. प्रकाश आंबेडकरांचं भीमा कोरेगाव चौकशी आयोगास पत्र; फडणवीसांचा उल्लेख करत केली मोठी मागणी

विशेष म्हणजे ही घटना घडण्यापूर्वी प्रवाशी महिलेची गाडीत चढण्याची धडपड पाहून आरपीएफची महिला जवान आधीच सतर्क होती. अंतिम मंडलोय असे या महिला जवानाचे नाव असून तिने महिला प्रवाशाला बाहेर खेचून तिचा जीव वाचवला. यानंतर गाडी थांबवून त्या महिलेस तिच्या नातेवाईकांसोबत गाडीतून पाठवून देखील दिले. महिला प्रवाशाचा जीव वाचवल्यामुळे अंतिम मंडलोयवर सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com