Manipur News: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची (Manipur Clashes) घटना घडली आहे. यामध्ये बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे तर आसाम राफल्सचे दोन जवान जखमी झाले आहेत. मणिपूर हिंसाचारानंतर या राज्यामध्ये कर्फ्यू सुरु आहे. याचदरम्यान सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुरक्षा दल आणि आदिवासी समाजाच्या गटामध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एक जवान शहीद (jawan martyred) झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.
मणिपूरमधील हिंसाचार थांबवण्यासाठी सुरक्षा दलाकडून कडक बंदोबस्त असतानाही राज्याच्या विविध भागातून हिंसाचाराच्या घटना घडतच आहेत. मणिपूरच्या सेराऊ भागात कर्फ्यू दरम्यान हिंसाचार झाला. या परिसरात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरु होती. त्याच दरम्यान सुरक्षा दलांनी घेरलेले पाहून गोळीबार सुरू केला. सेरू येथे झालेल्या गोळीबारात एक बीएसएफ जवान गंभीर जखमी झाला असून आसाम रायफल्सच्या दोन जवानांना गोळी लागल्याने ते जखमी झाले.
जखमी जवानांना उपचारासाठी मंत्रीपुखरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी बीएसएफ जवान रणजीत यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आसाम रायफलच्या गंभीर जखमी झालेल्या जवानांवर उपचार सुरु आहेत. लष्कराने ही माहिती दिली आहे. मणिपूरमध्ये बंडखोरांकडून सातत्याने गोळीबार सुरू असून घटनास्थळी सुरक्षा दल तैनात करण्यात येत आहे.
मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने इंटरनेट बंदी 10 जूनपर्यंत वाढवली आहे. आयुक्त एच ज्ञान प्रकाश यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ब्रॉडबँडसह मोबाइल डेटा सेवांचे निलंबन 10 जून दुपारी 3 वाजेपर्यंत वाढवण्यात आले आहे. राज्यात 3 मेपासून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कर, आसाम रायफल्स, पोलीस आणि सीआरपीएफने शनिवारी मणिपूरमधील डोंगराळ आणि खोऱ्यातील भागात एरिया डोमिनेशन ऑपरेशन सुरू केले. मानवरहित हवाई वाहने आणि क्वाडकॉप्टर्सद्वारे पाळत ठेवून आतापर्यंत 40 शस्त्रे, मोर्टार, दारूगोळा आणि इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.