Nana Patole
Nana Patole  Saam Tv
मुंबई/पुणे

इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी आडनाव गृहित धरणे चुकीचे : नाना पटोले

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. परंतु अनेक ठिकाणी केवळ आडनावावरून जात गृहित धरली जात असल्याचे समोर आले असून ही पद्धत चुकीची आहे. ओबीसी समाजाची योग्य आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी संबंधितांना सुचना देऊन योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. ( Nana Patole News In marathi )

यासंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवले आहे. या पत्रात नाना पटोले लिहिले आहे की, 'ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. ओबीसी संदर्भातील डाटा गोळा करण्याचे कामही सुरु आहे पण आडनावावरून जात ठरवली जात असल्याचा प्रकार गंभीर आहे. एकाच आडनावाचे लोक विविध जातीत आहेत. ही पद्धत शास्त्रोक्त नाही, या पद्धतीने डाटा गोळा केल्यास ओबीसी समाजाची खरी संख्या समोर येणार नाही व समाजावर अन्याय होईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जातीने लक्ष घालावे'.

दरम्यान, ओबीसी (OBC) समाजाला राजकीय मिळावे म्हणून सर्वांनी लक्ष घातले पाहिजे. ओबीसी संघटना, सर्व राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी अचूक आकडेवारी जमा होईल यात लक्ष घालावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. नाना पटोले यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Lok Sabha : जळगावमध्ये आरोपांची राळ उडाली; लोकसभेचं रणांगण तापलं, ठाकरे गटाच्या नेत्यानं केला मोठा दावा

Wedding Rituals: लग्नामध्ये नववधूला चांदीची जोडवी का घातली जातात?

Shantigiri Maharaj : संकटमोचक धावून गेले, त्यांनाही अपयश आलं; भाजपसमोरचं संकट वाढलं!, शांतीगिरी महाराज ठाम

Sonal Chauhan: सौंदर्यवती सोनल; साडीतील फोटोंनी घातली भुरळ

South Africa Squad: T20 WC 2024 साठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा! IPL गाजवणाऱ्या या खेळाडूंना मिळालं स्थान

SCROLL FOR NEXT