नाना पटोले SaamTv
मुंबई/पुणे

भाजपच्या 'या' भूमिकेमुळे त्यांची थट्टा व्हायला लागली आहे- नाना पटोले

'जनतेच्या मूळ प्रश्नांवरुन सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी ईडीची कारवाई'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक -

मुंबई : जनतेच्या मूळ प्रश्नांवरुन सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी ED ची कारवाई भाजप करत आहे. त्याला घाबरायची काहीच गरज गरज नसल्याचं वक्तव्यं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी Nana Patole केलं. तसेच जनतेचे प्रश्न घेऊन केंद्र सरकार विरोधात आम्ही लढणार असल्याचही त्यांनी सांगितलं. देशाच्या अंतर्गत प्रश्न असो वा बाहेरचे प्रश्न केंद्र सरकार फेल झालं असून 'सगळे चोर आहेत' ही भूमिका भाजप घेतं असल्याने त्यांची थट्टा व्हायला लागली आहे आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांना आता लोकं 'कॉमेडी मॅन' म्हणायला लागले आहेत असही पटोले म्हणाले. (Nana Patole criticizes BJP leaders)

हे देखील पहा -

तसेच अमित शाह Amit Shah यांच्या मुलाची संपत्ती नऊ पट वाढते त्यांना भीती वाटत नाही इतरांना कशी वाटेल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हे सगळे तपास मोदींच्या Narendra Modi काळातील पाप असून कसं ब्लॅककमेलिंग (Blackmailing) केलं, कसं पैसे उकळले या सगळ्याचे 2024 मध्ये बिंग फुटेल असही ते म्हणाले.

लोकांचा मृत्यूच सेलिब्रेशन करणार का?

लसीलरणाच सेलिब्रेशन (Celebration of vaccination) आधीच व्हायला हवं होतं म्हणजे लोकांचं जीव वाचले असते मात्र मादींनी आपल्या लसी दुसऱ्या देशात दिल्याच शिवाय लसीकरणाच राजकारण केलं जातं आहे इतकी जीवितहानी झाल्यावर 100 कोटी डोसच सेलिब्रेशन करणार, तर ज्या लोकांचा मृत्यू झाला त्याच सेलिब्रेशन करणार का? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह (Devendra Fadnavis and Amit Shah) यांची भेट साखरेच्या संदर्भात होती की कडू गोष्टीसाठी हे कळेल असा टोलाही त्यांनी फडणवीस आणि शहा यांच्या भेटीवरती लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

SCROLL FOR NEXT