NALASOPARA MINOR GIRL ASSAULT CASE saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

Nalasopara Minor Girl Case Latest News: नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण उघडकीस आले. तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

मनोज तांबे, साम टीव्ही

नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित मुलीला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन आरोपींविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून ते अल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडी येथील बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळींज पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

काँग्रेसने एकाचवेळी महाराष्ट्रासह ६ राज्याचे प्रभारी बदलले; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC पेपरफुटीवर राजकारण तापलं, राहुल गांधी म्हणतात, 'MPSCवर भाजपचा ताबा'

24 तासांत 5 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्ज आणि नापिकीचा विळखा

अपघाताचा थरार! चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं अन् ३-४ वाहनांना धडाधड उडवलं

SCROLL FOR NEXT