CCTV footage captures the brutal assault of a married teacher by her in-laws in Nalasopara, triggering public outrage. saam tv
मुंबई/पुणे

विवाहित शिक्षिकेला सासू, सासरे, दोन नणंद, दीर आणि नणंदेच्या पतीकडून बेदम मारहाण; अमानुष छळ सीसीटीव्हीत कैद

Nalasopara Teacher Assaulted By In Laws Cctv Video: नालासोपाऱ्यात विवाहित शिक्षिकेवर सासरच्यांकडून अमानुष मारहाण झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

मनोज तांबे, साम टीव्ही

नालासोपारा: नालासोपारा पूर्व परिसरात एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींकडून निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या व्हिडीओमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. नालासोपारा पूर्व येथील शांती लाईफ इमारतीमध्ये स्वप्नाली सिंग या आपल्या पती आणि लहान मुलीसह राहतात. स्वप्नाली या पेशाने शिक्षिका असून त्या घरातच मुलांच्या शिकवण्या घेतात. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १३ वर्षांपासून सासरच्यांकडून त्यांचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात आहे.

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सासरचे मंडळी स्वप्नाली यांना कशाप्रकारे अमानुषपणे मारहाण करत आहेत, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. सासू, सासरे, दोन नणंद, दीर आणि नणंदेचे पती अशा सर्वांनी मिळून त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप स्वप्नाली यांनी केला आहे. वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत असूनही सासरच्यांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

१३ वर्षांपासून हुंड्यासाठी छळ

गेल्या १३ वर्षांपासून सासरचे लोक हुंड्याच्या पैशांसाठी मला त्रास देत आहेत. हा छळ आता असह्य झाला आहे, असे स्वप्नाली सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT