Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Crime News: धक्कादायक! प्रेयसीच्या शरीरावर रॉकेल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपी प्रियकर अटकेत

या हल्ल्यामध्ये प्रेयसी जखमी झाली असून ती ७० टक्के भाजली आहे. तसेच तिला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चेतन इंगळे

Nalasopara News: सर्वत्र महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच नालासोपाऱ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्व धील प्रगतीनगर परिसरात शुभम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या संतोष पांचाल या प्रियकराने आपल्यासोबत राहणाऱ्या प्रेयसीला रॉकेल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News Update)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष पांचाल हा आपल्या प्रेयसीबरोबर लॉकडाऊन पासून एकत्र राहत होता. लॉकडाऊनच्या आधी या दोघांची ओळख झाली होती. त्याची प्रेयसी आमिषा पांचाल (३७) हीचे आधीच लग्न झाले असून तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ती संतोष बरोबर आपल्या तीन मुलांसह लिव्हइन मध्ये राहत होती. संतोष हा रिक्षाचालक आहे.दोघांमध्ये आर्थिक अडचणीतून नेहमी वाद होत असे .

घटनेच्या दिवशी म्हणजेच सात तारखेच्या रात्री दोघांमध्ये नेहमी सारखं भांडण झाले. मात्र हा वाद विकोपाला गेला. यावेळी रागाच्या भरात संतोषने आमिषाच्या शरीरावर रॉकेल ओतले व तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये आमिषा गंभीर जखमी झाली असून ती ७० टक्के भाजली आहे. तसेच तिला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्षुल्लक कारणावरून वाद; माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला, नाशिकमध्ये चाललंय काय ?

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Nanded Rain : नांदेडमध्ये मध्यरात्री ढगफुटीसारखा पाऊस, ५ जण दगावल्याची भीती, ४० जनावारांचा मृत्यू

Jalgaon Crime News : जळगाव पुन्हा हादरले; भररस्त्यात गाठून तरुणाची हत्या

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT