Sanjay Raut Share Bjp Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

BJP Viral Video: भाजप पदाधिकाऱ्याकडून पोलिसांना धक्काबुकी, संजय राऊत यांनी ट्वीट केला व्हिडीओ

Sanjay Raut Share Bjp Viral Video: भाजप पदाधिकाऱ्याकडून पोलिसांना धक्काबुकी, संजय राऊत यांनी ट्वीट केला व्हिडीओ

Satish Kengar

Sanjay Raut Share Bjp Viral Video:

एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भाजप पदाधिकाऱ्याने पोलिसांना धक्काबुकी केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत भाजप पदाधिकारी पोलिसांना धक्काबुकी करत असल्याचं दिसत आहे. ही घटना नागपूरमध्ये घडली असल्याची माहितीही राऊत यांनी दिली.

या व्हिडीओत धक्काबुकी झाली ते नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने असून भाजप युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव याने त्यांना धक्काबुकी केली असल्याचं संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

संजय राऊत यांनी काय केलं ट्वीट?

संजय राऊत ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे. पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना भाजप युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्काबुक्की केली. खाकी वर्दीच्या कॉलरला हात घातला. महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच झाला नव्हता.'' (Latest Marathi News)

राऊत यांनी हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. साम टीव्हीशी संवाद साधताना त्या म्हणाल्या आहे की, ''पुष्कर पोशेट्टीव याने पोलिसांना धक्काबुकी केली.''

त्या म्हणाल्या, ''भाजप पदाधिकारी एका उपायुक्त पदाच्या अधिकाऱ्यांसोबत अशा पद्धतीने गुंडागर्दी करून दहशत माजवत तर सर्वसामान्य नागरिकांसोबत ते काय करत असतील.'' दरम्यान, राऊत यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवरून राज्यातील राजकारण तापू शकतं. या व्हिडीओवर अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रुपाली चाकणकर यांनी बटेंगे तो कटेंगे वादावरून भाजपला घराचा आहेर

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

गौरी खानला शालिनी पासीबद्दल जाणवते चिंता, काय आहे नेमक कारण?

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनाही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

Maharashtra Election : संभाजीनगरमध्ये सोन्याची गाडी सापडली, १९ कोटींचं घबाड जप्त!

SCROLL FOR NEXT