maharashtra politics  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : ठाण्यातून मनसे- मविआच्या युतीचा शुभारंभ? ठाण्यात विरोधकांची रणनिती ठरली?

Maharashtra Political Update : महाविकास आघाडीत मनसे सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालयं... त्यातच ठाण्यातील एका बैठकीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय.. त्यामुळे महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यातील युतीचा शुभारंभ ठाण्यातून कसा होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालीय. आणि याला कारण ठरलयं... मविआ आणि मनसे नेत्यांची जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी झालेली बैठक... या बैठकीचा व्हिडिओ स्वत: जितेंद्र आव्हांनी पोस्ट करत ठाण्यातील नागरी समस्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली...या बैठकीला ठाकरेसेनेचे माजी खासदार राजन विचारे,मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाणही उपस्थित होते...

दरम्यान ठाण्यात महायुतीविरोधात मविआ आणि मनसे कोणत्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समोरे जाणार? मविआची रणनिती काय असेल? पाहूयात...

ठाण्यात रस्त्यावरील वाहतुक कोंडी आणि पाणीटंचाई या प्रमुख समस्या आहे. या समस्यांविरोधात विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र येणार. तसचं ठाण्यातील भ्रष्टाचाराविरोधात मविआ आणि मनसे आक्रमक भूमिका घेणार. मनसे आणि महाविकास आघाडी जनतेच्या प्रश्नांसाठी जनआंदोलन उभारून जनमत मिळवण्याचा प्रयत्न करणार. vv

मनसे आणि ठाकरेसेनेची अद्याप अधिकृत युती झालेली नाही. अशातच ठाण्यात मविआसोबत मनसेचे पदाधिकारी एकत्र आल्यानं मनसे आणि महाविकास आघाडी यांच्यातील युतीचा हा श्रीगणेशा असल्याची चर्चा रंगलीय.

दरम्यान कल्याणमध्ये काही दिवसांपूर्वी नागरी प्रश्नावरुन ठाकरे सेना आणि मनसेने मिळून आंदोलन केलं होतं. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी ठाकरेसेनेसोबत मविआतील इतर घटकपक्षांसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतयं..त्यामुळे मुंबईपाठोपाठ ठाण्याचा गड जिंकण्यासाठी विरोधक एकत्र येऊन महायुती समोर कसं आव्हान उभं करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Control Tips: डायबिटीज होईल झटक्यात कमी, फक्त या ५ टिप्स करा न चुकता फॉलो

Nagar Parishad Nagar Panchayat Election: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा, कशाप्रकारे होणार मतदान प्रक्रिया, काय असतील नियम?

गुणकारी लवंग; ब्लड शुगर, ब्लड प्रेशर अशा अनेक समस्यांवरील रामबाण उपाय

Red Chilli Chutney Recipe: झणझणीत लाल मिरची चटणी कशी बनवायची?

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या दिवशी खात्यात ₹२००० येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT