MVA Leaders to meet Devendra Fadnavis to ensure unopposed Rajyasabha election 2022
MVA Leaders to meet Devendra Fadnavis to ensure unopposed Rajyasabha election 2022 Saam Tv
मुंबई/पुणे

Rajyasabha Election : निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मविआ नेते घेणार फडणवीसांची भेट

सूरज सावंत

मुंबई: महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज (शुक्रवारी) देवेंद्र फडणवीसांची (Devednra Fadnavis) भेट घेणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील (Rajyasa Election 2022) घोडेबाजार टाळण्यासाठी ही भेट घेणार आहे. यावेळी छगन भुजबळ, अनिल देसाई, सुनिल केदार, सतेज पाटील हे मविआ (Mahavikas Aaghadi) फडणवीसांची भेट घेणार आहेत. राज्यसभा निवडणूक बिनविरोध (Unopposed) करण्यासाठी हे नेते फडणवीसांशी चर्चा करणार आहेत. आज राज्यसभेच्या निवडणुकीच्या अर्जमाघारीचा शेवटचा दिवस आहे. भाजपने (BJP) आपला अतिरिक्त उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा अर्ज भरला असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यामुळे फडणवीसांची मनधरणी करण्यासाठी मविआ नेते फडणवीसांशी चर्चा करणार आहे. (MVA Leaders to meet Devendra Fadnavis to ensure unopposed Rajyasabha election 2022)

हे देखील पाहा -

राज्यसभेच्या या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये असा प्रयत्न मविआ नेत्यांचा आहे. या जागेच्या बदल्यात विधानपरिषदेची जागा सोडण्याची तयारी मविआ दाखवू शकते. मात्र सत्ता स्थापनेच्या वेळेस शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात शिवसेनेने सत्ता स्थापन केली होती, हे देखील फडणवीसांना विसरता येणार नाही. तिसरी जागा निवडून आणण्यासाठी भाजपला १३ मतं कमी पडत आहेत. महाविकास आघाडीत असलेले अपक्ष आमदार सध्या मविआ सरकारवर नाराज आहेत, कारण सरकार स्थापन झाल्यानंतरही त्यांना मविआ सरकारने कोणतही ठोस आश्वासन दिलेलं नाही, त्यामुळे ते भाजपसोबच जाण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी निवडणूकच बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.

राज्यसभेच्या जागांचं गणित

राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.

सख्याबळ

सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. यात शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार: नारायण राणेंना विश्वास

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

SCROLL FOR NEXT