सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट; म्हणाले...,

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना गुरूवारी कोरोनाची लागण झाली.
Soniya Gandhi News, PM Narendra Modi Latest Marathi News
Soniya Gandhi News, PM Narendra Modi Latest Marathi NewsSaam TV

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना गुरूवारी कोरोनाची (Corona) लागण झाली. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस (Congress) नेत्यांसोबत बैठका सुरू होत्या. या बैठकीदरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहेत. दरम्यान, सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सोनिया गांधी लवकरात लवकर बऱ्या व्हावात यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (PM Narendra Modi Latest Marathi News)

Soniya Gandhi News, PM Narendra Modi Latest Marathi News
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; २ परप्रांतीय मजुरांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

"काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी कोविड-19 मधून बऱ्या व्हाव्यात, लवकरच त्यांनी कोरोनावर मात करावी अशा शुभेच्छा मी त्यांना देतो" असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांनी स्वत: ला आयसोलेट केली असल्याची माहिती आहे. दुसरीकडे सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येताच बैठकीला हजर असलेल्या कॉंग्रेस नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे. सोनिया यांच्या संपर्कात आलेल्या इतरही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केला जात आहे.

सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस

दरम्यान, बुधवारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली आहे. नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सोनिया गांधींना 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पण आता सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांची चौकशी होणार की नाही? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड प्रकरणात 55 कोटींचा गैरव्यवहार झाला होता. याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता. 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. 2008 मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे 76 टक्के शेअर होते. तर इतरांकडे 24 टक्के शेअर होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला 90 कोटींच कर्जही दिलं होतं. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहन केलं होतं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com