श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) सर्वसामान्यांवर होणारे दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांनी (Terrorist Attack) एका बँक कर्मचाऱ्याची हत्या केल्याची घटना समोर आली होती. आता बडगाममध्ये (Budgam) परप्रांतीय मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या मजुरावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Jammu and Kashmir Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, बडगाम मगरेपोरा चडूरा भागात अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात वीटभट्टीवर काम करत असलेल्या एका मजूराचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. दिलखुश असं मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव असून तो बिहार येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, राजन असे दुसऱ्या मजुराचे नाव असून, तो पंजाबचा रहिवासी आहे.
काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गैर-काश्मिरी किंवा हिंदू नागरिकांची निवडक हत्या केली जात आहे. गेल्या महिन्यात अशा तीन घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे गुरूवारी दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये एका बँक मॅनेजरवर गोळीबार केला. या हल्ल्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांचा मृत्यू झाला. विजयकुमार हे राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी होते. ते कर्तव्यावर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
अमित शाह-डोभाल यांच्यात चर्चा
काश्मीरमध्ये हत्यासत्र सुरूच असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गुरुवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या वेळी ‘रॉ’चे प्रमुख सामंत गोयल उपस्थित होते. या वेळी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेच्या मुद्दय़ावर चर्चा झाली असून, अमित शहा हे आज, शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत अजित डोभाल यांच्यासह जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित राहणार आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.