Mumbai Corporation Announce 45 lakh People in Risk Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Alert: अलर्ट! ४५ लाख मुंबईकरांना पावसाळ्यात पुराचा धोका, कारण काय?

Mumbai Corporation Announce 45 lakh People in Risk: राज्यात पावसाळा सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत पावसाचे आगमन होण्याचे सांगण्यात येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात ४५ लाख मुंबईकरांना धोका असल्याचे महापालिकेच्या अहवालात समोर आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जून महिना सुरु झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरवर्षी मुंबईत सुमारे २३०० मीमी पाऊस पडतो. यामध्ये अनेकदा एकाचवेळी २०० ते ४०० मीमी पाऊस पडतोय त्यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होते.

प्रत्येक वर्षी पावसात मुंबई ही एकदा तरी बंद होते. मुंबईत होणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचते. मुंबईत जवळपास १०० ठिकाणे पाणी तुंबणारी असल्याचे समोर आले आहे. मुंबईत जवळपास ३५ टक्के लोक पूरप्रवण क्षेत्राजवळा राहतात, हे लोक पुरप्रवण क्षेत्राच्या २५० मीटर क्षेत्रात राहतात. असे मुंबई महापालिकेच्या अहवालात समोर आले आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबते, नदी- नाल्यांमधून पाणी बाहेर येते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा लोकांच्या घरात पाणी घुसते. त्यावर पावसाच्या आधीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

मुंबई शहर समुद्रसमाटीपासून कमी उंचीवर आहे. त्यामुळे मुंबईत जास्त पाऊस पडल्यास समुद्राला भरती येते. त्यामुळे पावसाचे पाणी समुद्रात जाण्यापासून रोखले जाते. यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबते. यामुळे पूरप्रवण क्षेत्रातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागते. ही परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पालिका अनेक उपाययोजना करत आहेत.

महापालिकेने नाल्यांलगतच्या झोपडपट्टी परिसरात पाणी येऊ नये, यासाठी संरक्षक भितींची उभारणी केली आहे. तसेच मिलन सब वे, हिंदमाता या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या लावण्यात आल्या आहे. तसेच पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT