School Opening Date: मोठी बातमी! चिमुकल्यांची किलबिल कानी पडणार, १५ जूनला शाळेची घंटा वाजणार

Academic Year Will Start From 15 June: शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार यावर्षी शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. शाळा उघडल्यानंतर लगेच दोन दिवस सुट्टी मिळणार आहे.
शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार
School Opening DateSaam Tv

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. उन्हाळी सुट्टी संपत आलीय. लवकरच विद्यार्थ्यांना दप्तर घेवून शाळेत जावं लागणार आहे. परंतु त्यानंतर लगेच दोन दिवसांची सुट्टी देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष यावर्षी १५ जूनपासून सुरू होत आहे. त्यानंतर १६ आणि १७ तारखेला लगेच सुट्टी मिळणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

शिक्षण विभागाच्या आदेशानुसार (Education Department) यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळांची वेळ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आता सकाळी नऊ असणार (School Opening Date) आहे. दरम्यान, १५ जूनला शाळेचा पहिला दिवस असला तरी १६ जूनला रविवार आहे. तर १७ तारखेला बकरी ईद असल्याने पुढील दोन दिवस लगेचच शाळांना सुटी असणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील ५७४ शाळांमधून ४ हजार ४५१ जागांसाठी पालकांकडून अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज करण्यासाठी मंगळवारी (४ जून) शेवटची मुदत (Academic Year Will Start From 15 June) होती.

शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार
VBA Opposes Manusmriti In School Syllabus: मनुस्मृतीचे समर्थन करणारा शैक्षणिक आराखडा रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू : वंचितचा इशारा

त्यानुसार शिक्षण विभागाला एकूण १५ हजार ३४ अर्ज प्राप्त झाले (School Opening Date Maharashtra) आहेत. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत (लॉटरी) शुक्रवारी (ता. सात) सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण व्हीसीद्वारे करण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार
Zila Parishad School: यॅक यॅक! शाळेतील पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये अळ्या; यवतमाळमधील धक्कादायक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com