पालिका निवडणुकांचे बार उडणार!; प्रभाग आरक्षणाची दिवाळी नंतर सोडत? होणार - साम टिव्ही
मुंबई/पुणे

पालिका निवडणुकांचे बार उडणार!; प्रभाग आरक्षणाची दिवाळी नंतर सोडत?

मुंबई शहराचं व्यवस्थापन बृहन्मुंबई महानगर पालिकेमार्फत केलं जातं. या मुंबई महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे.

सुरज सावंत

मुंबई शहराचं व्यवस्थापन बृहन्मुंबई महानगर पालिकेमार्फत केलं जातं. या मुंबई महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे . हीच सत्ता कायम राखण्याचं शिवसेने समोर आव्हान असणार आहे, तर भाजप आणि इतर पक्षांसाठी पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावण्यासाठी संधी असणार आहे . कारण २०२२ मध्ये बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत . फेब्रुवारी २०२२ मध्ये या निवडणूका होण्याची शक्यता असून त्यासाठी महिला आणि जातीनिहाय प्रभागांच्या आरक्षणासाठी दिवाळीनंतर लॉटरी काढली जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या नंतर उमेदवारांना आपले प्रभाग आणि मतदार बांधणी करण्यास आणि आपल्या ऐच्छिक पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करता येणार आहे. या सोडतींची प्रत्येक उमेदवार निवडणुकीपूर्वी आरतुरतेने वाट पाहत असतो.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या देखील इतर वैधानिक आस्थापनांप्रमाणे पंचवार्षिक निवडणूका होत असतात, २२ फेब्रुवारी २०२७ ला या आधी पालिकेच्या झाल्या होत्या, तर ९ मार्चला महापौर निवडणूक पार पडली होती. तर ८ मार्च २०२२ ला या सभागृहाचा कार्यकाळ संपतोय. हा कार्यकाळ संपण्यापूर्वी नवीन सदस्य निवडून येऊन सभागृह अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यामुळे येत्या फेब्रुवारी मध्ये या निवडणूका होणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी प्रभागांचं आरक्षण जाहीर केल जात. यात जातीनिहाय तसेच महिला आरक्षण प्रभाग जाहीर केले जातात. निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर केली जाते त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. हे आरक्षण ऑक्टोबर महिन्यात जाहीर होणे अपेक्षित होतं, परंतु पितृपक्ष आणि त्यानंतर नवरात्र आदींमुळे हे प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आलं नव्हतं.

सार्वत्रिक निवडणुकीआधी दर पाच वर्षांनी प्रभाग आरक्षण सोडत तर दर दहा वर्षांनी प्रभाग रचना केली जाते. त्यानुसार निवडणूक पार पाडली जाते. मागील सार्वत्रिक निवडणुकी आधी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेबाबत विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर निवडणूक विभागाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश पालिकेच्या निवडणूक विभागाला दिले होते. त्यानुसार प्रभाग फेररचनेचे काम सुरु असून आतापर्यंत निवडणूक विभागाने तयार केलेल्या अहवालानंतर उपायुक्त सुनील धामणे आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी प्रभागांच्या रचनेत करण्यात आलेल्या बदलाबाबत पाहणी केली आहे. यामुळे लवकरच प्रभागाच्या रचना बदलल्यावर जातीनिहाय व महिला आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मोठी बातमी! उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला

Bank Jobs 2025 : मोठी संधी! कॅनरा बँकेत लेखी परीक्षेशिवाय नोकरी, फक्त मुलाखत द्या आणि २२,००० रुपये पगार मिळवा

Viral Video: जीव धोक्यात घालून महिलेने दरोडेखोरांना शिकवला धडा, थेट ऑटोरिक्षाला लटकली...

Rahuri Rasta Roko : नगर- मनमाड महामार्ग रोखला; रस्त्याच्या कामासाठी नागरिक आक्रमक

Rajesh Khanna : राजेश खन्ना यांनी 13 वर्षीय अभिनेत्रीला केली होती किस, सुपरस्टारबद्दल धक्कादायक दावा

SCROLL FOR NEXT