Mumbra News Saamtv
मुंबई/पुणे

Mumbra News: दुर्देवी! विजेचा धक्का लागून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू; कुटूंबीयांवर शोककळा

जमिनीच्या विद्युत वाहिन्या उघड्यावर पडल्या असून त्या अंडरग्राउंड केल्या गेलेल्या नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे...

कल्पेश गोरडे

Mumbra News: मुंब्रा येथील डोंगरे नगर, किस्मत कॉलनी परिसरात एका ११ वर्षीय मुलाचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुहेल फिरोज खान (११) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो अमिनाबाद, चांदनगर येथील रहिवासी आहे. मुलाच्या मृत्यूसाठी स्थानिक लोक टॉरंट पॉवरला जबाबदार धरत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत मुलगा हा संध्याकाळच्या सुमारास कादरी मशिदी येथे नमाजसाठी आला होता. त्याच दरम्यान मशिदीच्या गेटमध्ये करंट आला आणि त्याला विजेचा झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाला. नमाज झाल्यानंतर जेव्हा सर्व लोक बाहेर आले त्यानंतर हा मुलगा खाली पडल्याचे लोकांना दिसून आले.

स्थानिकांनी त्याला तात्काळ प्राइम हॉस्पिटलमध्ये भरती केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. यावर स्थानिकांनी टोरंट पॉवरवर आरोप करत रस्त्यावर, जमिनीच्या विद्युत वाहिन्या उघड्यावर पडल्या असून त्या अंडरग्राउंड केल्या गेलेल्या नाही, ते धोकादायक ठरू शकत असल्याचे म्हणले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे मुंब्रा परिसरात शोककळा पसरली असून सुहेलच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या बाबत मुंब्रा पोलिसांना माहिती मिळाली असता मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT