Mumbra Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbra Crime News: मोबाईल जिहादचा मास्टर माईंड अखेर गजाआड, ऑनलाईन करायचा तरुणांचं धर्मांतर

Mobile Jihad: मोबाईल जिहादचा मास्टर माईंड अखेर गजाआड, ऑनलाईन करायचा तरुणांचं धर्मांतर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> कल्पेश गराडे

Mumbra Crime News: एक मोठी बातमी समोर येत आहे. मोबाईल जिहाद मास्टर माईंड शहानवाजला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथून त्याला अटक करण्यात आली आहे. रायगड येथून लवकरच मुंब्रा पोलीस ठाण्यात त्याला हजर करणार आहेत.

शाहनवाज खान देशभरात सुरु असलेल्या ऑनलाईन धर्मांतरचा मास्टर माईंड आहे. त्याने फेक युजर आयडी बनवून त्याच्या मदतीने एक गेम लॉन्च केला होता. या गेममध्ये हिंदू मुलांना कलमा वाचण्यासाठी तयार करून इस्लाम कबूल करण्यास भाग पडल्याचे समोर आले होते. (Latest Marathi News)

हा आरोपी मुलांना इस्लाम कबूल केला तर तुम्ही कधी गेम हरणार नाही, असे अमिश दाखवत होता. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील गाजियाबाद पोलिसांनी या शाहनवाजचा शोध घेत मुंब्रा येथे पोहचले होते. मात्र आरोपी शाहनवाज हा आपल्या कुटुंबियांसोबत फरार झाला होता. गाजियाबाद पोलिसांच्या पथकाची स्थानिक मुंब्रा पोलिसांसोबत शोध मोहीम सुरु केली होती.

हिंदू धर्मीय मुलांना ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याची नोटीस उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी बजावली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहनवाज खान हा आपल्या कुटुंबियांसोबत मुंब्रा येथील देवरी पाडा परिसरात रहाणार असल्याची माहिती गाजियाबाद पोलिसांना मिळाली होती.

या प्रकरणाच्या तपासात उत्तर प्रदेश पोलिसांनी (Police) गाजियाबाद येथून अब्दुल रहमान उर्फ नन्नी पुत्र महमूद अन्सारी या आरोपीला अटक केली होती. कुटुंबीयांची तक्रार गाझियाबाद येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, महाराष्ट्रातील मुंबईला लागून असलेल्या मुंब्रा भागात शाहनवाज मकसूद खान हा बनावट युजर आयडी बनवून त्याच्या माध्यमातूनतो तो गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता.

या गेममध्ये हरलेल्या हिंदू मुलांना तो कलमा वाचायला सांगून इस्लाम कबूल करण्यास भाग पडत होता. त्यांना कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार असल्याचे प्रलोभन दाखवत होता. शाहनवाजच्या शेजारच्यांनी सांगितले की, त्याच्या घरात तीन भाऊ आणि आई असा परिवार आहे. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident : भीषण अपघात; बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू , ९ प्रवासी जखमी

LIC Faces Controversy: अदानीच्या कल्याणाची जबाबदारी LICकडे? LIC चे 33 हजार कोटी अदानीला

अक्षय नागलकर प्रकरणात मोठी अपडेट; 8 मित्रांनीच रचला मित्राच्या हत्येचा कट|VIDEO

Maharashtra Live News Update : रवींद्र धंगेकर यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटानं डाव टाकला; महायुतीत फुटीची शक्यता

SCROLL FOR NEXT