7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA मध्ये पुन्हा होणार वाढ? इतक्या रुपयांनी वाढणार पगार

Da Hike News 2023: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA मध्ये पुन्हा होणार वाढ? इतक्या रुपयांनी वाढणार पगार
Da Hike News 2023
Da Hike News 2023Saam TV
Published On

Da Hike News 2023: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळू शकते. केंद्र सरकार (Central Government) या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ करू शकते.

सरकारने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झाला होता. सरकार पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ करू शकते, अशी माहिती मिळत आहे.

Da Hike News 2023
Cheapest 5G Smartphone: फक्त 599 रुपयांमध्ये खरेदी करा 'हा' 5G स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे ऑफर

महागाईच्या आधारावर वाढतो डीए

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढला तर तो आता ४६ टक्क्यांवर पोहोचेल. त्यामुळे त्याचा पगार वाढणार आहे. महागाईचा ( Inflation) दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते. महागाई जितकी जास्त तितकाच डीए वाढतो. कामगार ब्युरो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची गणना करते. याची गणना ग्राहक किंमत निर्देशांकच्या (CPI-IW) आधारे केली जाते. (Latest Marathi News)

किती वाढणार पगार?

डीएमध्ये चार टक्के वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते, हे समजून घेऊ. समजा केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८,००० रुपये आहे. जर आपण ३८ टक्के पाहिले तर डीए ६,८४० रुपये होतो. दुसरीकडे ४२ टक्के पाहिल्यास ते ७,५६० रुपये होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२० रुपयांची वाढ होणार आहे.

Da Hike News 2023
Devendra Fadnavis News: राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष निवडीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'शरद पवार यांनी भाकरी...'

सरकारने मार्च २०२२ मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. यानंतर दोनदा डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. डीए हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भाग आहे. महागाईचा दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com