Mumbai Local Train Accident Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train Accident: हात निसटला, तो कायमचाच! शहाडमधील तरुणाचा लोकल अपघातात मृत्यू, आईचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो

Diva Mumbra Train Accident: शहाडमधील तरुणाचा लोकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात लेकाचा मृत्यू झाल्याने आईने टाहो फोडला.

Vishal Gangurde

अजय दुधाणे, साम टीव्ही

मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताने ४ कुटुंबांनी घराचा आधार गमावला आहे. मृतांमध्ये शहाडमधीलही एका तरुणाचा समावेश आहे. या तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आठवड्याच्या पहिली दिवशी मुंबई लोकलचा भयंकर अपघात झाला. मध्य रेल्वेवर दोन लोकलचे प्रवासी एकमेकांना धडकल्याने काही प्रवासी खाली पडले. या अपघातात एकूण १२ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. त्यातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. अनेकांनी लोकलमधील गर्दीमुळे अपघात झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या अपघातानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अपघातात शहाडच्या तानाजीनगर भागात राहणाऱ्या तरुणाचाही मृत्यू झाला आहे.

मुंब्रा-दिवा दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात उल्हासनगरमधील तानाजीनगर भागात राहणारा केतन दिलीप सरोज याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने तानाजीनगर हनुमान नगर या परिसरात शोककळा पसरली आहे. केतन हा परिसरातील एक चांगला मुलगा म्हणून ओळखला जायचा. तो ठाण्याच्या एका मार्केटिंग कंपनीत काम करायचा. केतनच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतनच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर त्याचे वडील ठाणे येथे रुग्णालयात पोहोचले आहेत. केतनच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने टाहो फोडला.

केतन सरोजच्या मृत्यूने राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. केतनचा भाऊ म्हणाला, 'माझा भाऊ ठाण्यात काम करत होता. तो सेल्स विभागात काम करत होता. तो शॅम्पू सारखे प्रॉडक्टची विक्री करायचा. सकाळी साडे आठच्या दरम्यान घरातून निघाला. त्यानंतर माझ्या घरातून फोन आला. त्यांनी सरोज लोकलमधून पडल्याची माहिती दिली. मला वाटलं की, फार जास्त काही झालं नसेल. त्यानंतर मी कुटुंबासोबत ठाणे रुग्णालयात गेलो. रुग्णालयात गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं कळालं. त्याचं लग्न झालं नव्हतं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT