Marathi School Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Marathi School: मुंबईत १० वर्षात १०० मराठी शाळा बंद; मराठी भाषा जगणार कशी?

Marathi Schools in Mumbai Face Closure: एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो, तर दुसरीकडे मुंबईतील मराठी शाळांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

Bhagyashree Kamble

एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो, तर दुसरीकडे मुंबईतील मराठी शाळांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेल्या दहा वर्षांत मुंबईत तब्बल १०० हून अधिक मराठी शाळांचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. विशेष म्हणजे, यातील ४० शाळा केवळ गेल्या सहा वर्षांतच बंद करण्यात आल्या आहेत. या काळात मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही ५००० पेक्षा अधिक पटीने घटली आहे.

दक्षिण मुंबईतील मुलांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवली

दक्षिण मुंबईतील सर्वाधिक पालक आपल्या मुलांना मराठी शाळांएवजी इंग्रजी किंवा कॉन्व्हेंट शाळांमध्ये धाडत आहेत. २०१९ आणि २०२५ या सहा वर्षांच्या कालावधीत फक्त दक्षिण मुंबईत २० मराठी शाळा बंद झाल्या आहेत. जी खरंतर अगदी गंभीर बाब आहे.

त्यातही दादरमधील नाबर गुरूजी विद्यालय ही नामवंत आणि जुनी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या या शाळांमध्ये फक्त इयत्ता ६वी ते १०वी विद्यार्थ्यांनाच शिकवले जाते. शाळेनं निर्णय घेतला आहे की, आता विद्यार्थी १०वी पूर्ण करेपर्यंत शाळा सुरू राहिल, त्यानंतर या शाळेला टाळं लागण्याची शक्यता आहे.

मराठी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

२०१९ - २०२० साली मुंबईत ४६९ मराठी माध्यमाच्या शाळा होत्या. आता २०२४-२५ पर्यंत ही संख्या ४२१ पर्यंत घसरली आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांची संख्या १,३५,००० वरून ८५,४६९ पर्यंत खाली आली. याचा अर्थ, ६ वर्षात जवळपास ५०,००० विद्यार्थी कमी झाले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तसेच युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशने सादर केलेल्या आकडेवारीवरून, मराठी शाळांमध्ये सतत घट होत असल्याचं चित्र आहे. २०१४-१५ शैक्षणिक वर्षात एकट्य बीएमसीने ३६८ मराठी माध्यमांच्या शाळा चालवल्या. आता ही संख्या २६२ वर पोहोचली आहे. अवघ्या एका दशकात १०० हून अधिक शाळांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: कमी बजेट… अफलातून सजावट! दिवाळीत घर सजवण्यासाठी हे सोपे उपाय वापरून बघा

पुन्हा Ind-Pak ड्रामा! रोहित-विराटकडून पाकिस्तानी चाहत्यांना स्पेशल गिफ्ट, नेमकं काय घडलं? Video

Maharashtra Live News Update: पालघरमध्ये अर्ध्या तासापासून परतीच्या पावसाची दमदार हजेरी

नाल्याच्या पुलावरून स्कूल व्हॅन उलटली अन् 10 विद्यार्थी...; नेमके काय घडले? VIDEO

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता मशाल सोडून कमळ हाती घेणार

SCROLL FOR NEXT