Air Pollution Mumbai  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Air Pollution: मुंबईच्या हवेची गुणवत्ता खूपच गंभीर, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता; सरकारला सुनावले खडेबोल

Mumbai High Court: मुंबईत हवेचे प्रदूषण प्रचंड वाढले असून याबाबत मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने मुंबईत हवेच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत राज्य सरकारलाच खडेबोल सुनावले आहे.

Priya More

मुंबईती हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मुंबईतील हवा इतकी खराब झाली आहे की हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेबाबत मुंबई हायकोर्टने चिंता व्यक्त केली आहे. हायकोर्टान याबाबत मुंबई महानगर पालिकेलाच खडेबोल सुनावले आहे.

मुंबईची हवा अत्यंत खराब झाली असून आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी चिंता मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली. वाहतूक कोंडीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाहतुकीचे योग्य प्रकारे नियमन होत नसल्यानेच मुंबईमधील हवेची गुणवत्ता खालावत चालली असल्याचे हायकोर्टाने नमूद केले आहे.

पश्चिम द्रुतगती मार्गावर जरा जाऊन बघा हजारो गाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. या गाड्या सतत धूर फेकत असतात यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असते. याकडे आता लक्ष दिले नाही तर भविष्यात परिस्थिती अत्यंत गंभीर होईल. वाहतुकीचे नियमन योग्य प्रकारे कसे होईल यासाठी ठोस उपाय योजना करा, असं हायकोर्टाने राज्य सरकारला सांगितले.

मुंबई हायकोर्टाच मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने यावेळी मुंबईतील प्रदूषणावरून राज्य सरकारला खडेबोल सुनावले. मुंबईतील प्रदूषणाचा मुद्दा हायकोर्टाने स्युमोटो सुनावणीसाठी दाखल करून घेतला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील १३१० रिक्त जागा भरल्या की नाहीत, अशी विचारणा देखील हायकोर्टाने यावेळी राज्य सरकारला केली. हायकोर्टाच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी सांगितले की, यातील काही जागा मंजूर केल्या आहेत. भरतीसाठी त्याची जाहिरात दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

Weekly Horoscope: या राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

भल्या पहाटे ८.२ तीव्रतेच्या भूकंपाने जमीन हादरली, 'या' देशाला त्सुनामीचा इशारा

Period changes with age: २०, ३० आणि ४० नंतर मासिक पाळीच्या फ्लो होतो बदल, डॉक्टरांनी सांगितली प्रत्येक वयोगटातील महत्त्वाची कारणं

SCROLL FOR NEXT