Mumbai Fire : मुंबईच्या चेंबूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; घराला लागलेल्या आगीत महिला होरपळली

Mumbai Fire update : मुंबईच्या वाशीनाका येथे आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिला होरपळली आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मुंबईच्या चेंबूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; घराला लागलेल्या आगीत महिला होरपळली
mumbai fire Saam tv
Published On

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईच्या चेंबूर वाशिनाका येथे एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीली एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अडकलेल्या ६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यशं आलं आङे. तर एक महिला होरपळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या चेंबूर वाशीनाका येथील एका म्हाडाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घराला आग लागली. गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर घरात ६ जण अडकले होते. त्या ६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. तर या आगीत एक महिला होरपळून महिला जखमी झाली आहे.

मुंबईच्या चेंबूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; घराला लागलेल्या आगीत महिला होरपळली
Mumbai Crime News : धक्कादायक! घरातील बेडरूममध्ये गांजाची लागवड; मुंबईत १५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

आग लागल्यानंतर काही वेळातच आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ राजेशकुमार घाटे आणि अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचाचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. तसेच त्यांच्याकडून आगीत अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.

मुंबईच्या चेंबूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; घराला लागलेल्या आगीत महिला होरपळली
Nagpur Crime : महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणाीवर; टवाळखोरांकडून महिला पेट्रोल पंप मालकाला धमकी Video

विक्रोळीत टेम्पो लावण्याच्या वादावरून एकाची मृत्यू

विक्रोळी पार्कसाईट येथे टेम्पो लावण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वादात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास विक्रोळी पार्कसाईट पोलीस करत आहेत.

मुंबईच्या चेंबूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; घराला लागलेल्या आगीत महिला होरपळली
Ghatkopar Fire News: मुंबईत अग्नितांडव! घाटकोपर परिसरातील इमारतीला भीषण आग; १३ जण जखमी

८ वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

घाटकोपरच्या शांतीसागर सोसायटीच्या जुन्या पाण्याच्या टाकीमध्ये पडून ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीत बुडाल्यानंतर नागरिकांनी त्याला तात्काळ बाहेर काढले. तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याच्या वडिलांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले. या प्रकरणाची कारवाई पोलिसांकडून केली जात आहे. सचिन जनबहादूर वर्मा असे मृत मुलाचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com