
रविवार म्हटलं की सु्ट्टीचा वार. या दिवशी सरकारी कार्यालये अन् खासगी कार्यालयांना सुट्टी असते. बहुतांश कर्मचार्यांना सुट्टी असते. मात्र, खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या काही व्यक्तींना रविवारच्या दिवशीही कामावर जावं लागतं. जर आपणही २२ डिसेंबरला घराबाहेर पडणार असाल तर, रेल्वेचे हे वेळापत्रक पाहून बाहेर पडा, कारण २२ डिसेंबरला मेगाब्लॉक आहे. हा मेगा ब्लॉक उपनगरीय विभागांत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.३४ ते दुपारी ०३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद उपनगरी सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर थांबतील. नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशीरा पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ०३.४० पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद उपनगरी सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवले जातील. नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशीराने पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवरून वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे पोहोचणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेवर वळवल्या जातील.
तसेच ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहील. तर पनवेल येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ पर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवेवर मेगा ब्लॉक राहील. तसेच ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ पर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
हे प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी जारी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.