पहाटे ४ वाजता कामशेतजवळ ट्रकचे नियंत्रण सुटून तो विरुद्ध लेनमध्ये घुसला.
समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसून दोघांचा जागीच मृत्यू झाला.
कारमधील चार जण गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर १० किमीपर्यंत मोठी वाहतूककोंडी झाली
Mumbai–Pune Expressway today accident updates : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे ट्रक अन् कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. काशेतजवळ पहाटे चार वाजता ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् डिव्हाडर ओलांडून ट्रक थेट समोरून येणाऱ्या कारवर जोरात आदळली. भयंकर अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.
अपघाताची माहित मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कामशेतजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर भयंकर अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणारा ट्रक नियंत्रणाबाहेर गेला आणि विरुद्ध लेनमध्ये घुसला. त्यानंतर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या कारला थेट धडकला.
ट्रकची धडक इतकी भीषण होती की कार पूर्णपणे चिरडली गेली. कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
ट्रक आणि कारच्या भीषण अपघातानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूककोंडी झाली. दीड तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई-पुणे लेनवर १० किमी पर्यंत वाहनांची रांग लागली होती. दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.