Mumbai Water Supply For 2 Days (on 4 Jan and 5 Jan 2024) Saam
मुंबई/पुणे

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो ! पाणी जरा जपून वापरा; २ दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Cut For 2 Days (on 4 Jan and 5 Jan 2024): पवई वेन्चुरी येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणा यामधील ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी जोडणीमध्ये गळती आढळून आली आहे. ही गळती रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत.

Bharat Jadhav

Mumbai Water Supply Stop For Two days:

मुंबईकरांनो, तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका एल व एस विभागातील काही परिसरामधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवणार आहे, तर काही ठिकाणी १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. (Latest News)

पवई वेन्चुरी येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणा यामधील ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी जोडणीमध्ये गळती आढळून आली आहे. ही गळती रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. पाईपलाइनमधील गळती दुरुस्तीसाठी मुख्य वैतरणा जलवाहिनी ही समानीकरण बिंदू भांडूप संकुल ते मरोशी बोगदापर्यंत रिक्त करणे आवश्यक आहे. दरम्यान जलवाहिनी रिक्त करून दुरूस्त करण्याचे काम गुरूवार दिनांक ४.१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ५.१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत (२४ तासांकरीता) चालू राहील. यामुळे मुंबई महानगरातील शहरातील पाणीपुरवठ्यावर खालील प्रमाणे परिणाम होणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१) ए विभाग - मलबारहिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे 'ए' विभागातील सर्व क्षेत्रात ( गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

२) सी विभाग - मलबारहिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे 'सी' विभागातील सर्व क्षेत्रात (गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

३) डी विभाग - मलबारहिल जलाशयातून व थेट पाणीपुरवठा होणारे 'डी' विभागातील सर्व क्षेत्रात (गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

४) ई विभाग - रेसकोर्स टनेल शाफ्टमधून पाणीपुरवठा होणारे ई विभागातील सर्व क्षेत्रात (गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

५) जी उत्तर व जी दक्षिण विभाग - जी/उत्तर व जी/दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व क्षेत्र व वरळी हिल जलाशयातून पाणीपुरवठा होणारे जी/दक्षिण विभागातील सर्व क्षेत्रात (गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

६) एल विभाग – खालील नमुद केलेल्या परिसरांमध्ये गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठा बंद राहील.

60 कॉर्ड मेन वेन्चुरी सप्लाय-

बीट क्र. १५६ - अप्परतुंगा, लोअरतुंगा, मारवा, रहेजा विहार, चांदिवली फार्म रोड, साकी विहार रोड, साकीनाका, इत्यादी

बीट क्र. १५७ – राम बाग रोड, चांदिवली फार्म रोड, नाहर अमृतशक्ती, आय.आर.बी. रोड, महिंद्रा क्वारी, विजय फायर रोड, संघर्ष नगर, इत्यादी

बीट क्र. १५८ – खैराणी रोड, मोहिली पाईप लाईन रोड

७) एस विभाग – खालील नमूद परिसरात गुरूवार दिनांक ४.०१.२०२४ रोजी दुपारी १२.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील.

आय.आय.टी.पवई क्षेत्र (रामबाग) -

म्हाडा जलवायू विहार, राणे सोसायटी, हिरानंदानी पवई, पंचकुटीर, तिरंदाज गावठाण, साईनाथ नगर, गोखले नगर, गरीब नगर, चैतन्य नगर, महात्मा फुले नगर, मोरारजी कंपाऊंड, रमाबाई नगर, हरीओम नगर, स्वामी नारायण नगर, गौतम नगर, इंदिरा नगर इत्यादी.

८) एच पूर्व विभाग - एच/पूर्व विभागातील सर्व क्षेत्रात गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

९) एच पश्चिम विभाग - एच/पश्चिम विभागातील सर्व क्षेत्रात गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

सदर प्रस्तावित कामामुळे गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत वर नमूद केल्याप्रमाणे विभागात पाणीपुरवठा होईल, तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. ह्या पाणीकपाती दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT