Devendra Fadnavis: मी राम मंदिरासाठी बदायूच्या जेलमध्ये होतो; देवेंद्र फडणवीसांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

Devendra Fadnavis on Ram Temple: या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील राम मंदिर आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Tv
Published On

गिरीश कांबळे, मुंबई

Devendra Fadnavis News:

अयोध्या येथील श्रीराम मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी भाजप नेत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत राम मंदिराच्या प्रतिकृतीची पूजा करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील राम मंदिर आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. (Latest Marathi News)

मुंबईतील राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या पूजाविधीच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , दिग्दगर्शक रोहित शेट्टी यांनी हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस म्हणाले,'संपूर्ण भारत हा राममय झाला आहे. प्रत्येक व्यक्ती हा अयोध्येला जाऊ शकणार नाही. त्यामुळे हा राम रथ तयार केला आहे. राम रथ समर्पित करण्यासाठी त्याची पूजा केली आहे. जे लोक तिथे जाऊ शकणार नाही, त्यांच्यासाठी हा राम रथ आहे'.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics: 'शिंदे गटाचे 7 खासदार भाजपकडून निवडणूक लढवण्यास तयार'

राजकारण करणाऱ्यांची उंची छोटी : फडणवीस

'राम सर्वांचे आहेत, कुणाला थांबवले नाही. यावरून कुणीही राजकारण करू नये. मी तीनही कारसेवेमध्ये होतो. राम मंदिरासाठीच्या आंदोलनातही होतो. जे लोक घरी घाबरून होते, त्यांच्यावर काय बोलायचे. जे राजकारण करत आहेत, त्यांची उंची छोटी आहे, अशी टीका फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे.

भाजपच्या लोकसभेसाठीच्या नव्या नाऱ्यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. 'आज त्यावर बोलणार नाही. आज त्यावर बोलत नाही, त्याला वेळ आहे. आज फक्त राम मंदिर, असे ते पुढे म्हणाले.

Devendra Fadnavis
Lok Sabha Election : तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार ४०० पार'; लोकसभेसाठी भाजपचा नवा नारा

फडणवीसांनी यावेळी राम मंदिराच्या आंदोलनाच्या आठवणींनाही उजाळा दिला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'तीनही कारसेवांमध्ये सहभागी होतो. बाबरीचा ढाचा कोसळला,तेव्हा मी तिथे होतो. मी बदायूच्या जेलमध्ये होतो. राम मंदिर हा सर्व कारसेवकांचा विजय आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. याचा अतिशय आनंद होत आहे'.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com