Plastic ban  Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांनो सावधान! प्रतिबंधित प्लास्टिक वापराल तर होईल दंडात्मक कारवाई

प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर कोणीही करु नये. तसेच या प्लास्टिकचा वापर केल्यास संबंधितांवर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्य शासनाने निश्चित केलेल्या प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन, वाहतूक, विक्री, साठवणूक, हाताळणी व वापरास पूर्णपणे बंदी (Plastic Ban) आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर कोणीही करु नये. तसेच या प्लास्टिकचा वापर केल्यास संबंधितांवर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने केले आहे. ( Mumbai Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात प्रतिबंधित प्लास्टिकवर बंदी घातलेली आहे.या प्रतिबंधित प्लास्टिकमध्ये प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या, एकदाच वापरात येणारे प्लास्टिकच्या ताट,ग्लास,चमचे इत्यादीचा सामावेश आहे. तसेच हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि द्रव्य पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठविण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक या सर्वांचा सामावेश होतो. या सर्व प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करू नये, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

दरम्यान, उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी सदर प्लास्टिकचा वापर करून उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ च्या कलम ९ अन्वये प्रथम गुन्‍ह्यासाठी ५,०००/- रुपये, दुसऱ्या गुन्‍ह्यासाठी १०,०००/- रुपये दंड आकारला जाईल. तसेच त्यानंतरच्या गुन्‍ह्यासाठी ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवास व रुपये २५,०००/- पर्यंत दंड वसूल करण्यात येईल. सर्व संबंधितांनी कायद्याचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. उपरोक्त प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर हा उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक केल्याने पर्यावरणाची हानी होते. त्यामुळं प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

Maharashtra Government: महाराष्ट्रातील मंत्र्यांचे टेन्शन वाढलं, परफॉर्मन्स ऑडिट होणार; नेमकं कारण काय?

Taj Hotel viral video : पायात कोल्हापुरी चप्पल, खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्याने ताज हॉटेलमध्ये वाद; महिलेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! भाजप नेत्याच्या पुतण्याची चाकू भोसकून हत्या; क्षुल्लक कारणावरून संपवलं, कारण काय?

Soft Chapati Tips: मऊ अन् फुलणारी चपाती बनवण्याचे सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT