Newlywed Doctor Ends Life Amid Alleged Illicit Affair Saam
मुंबई/पुणे

आत्महत्यापूर्वी डॉ. गौरी कुठे होत्या? डान्स प्रॅक्टिसच्या काही तासानंतर का जीव दिला? वडिलांकडून मोठी माहिती उघड

Newlywed Doctor Ends Life Amid Alleged Illicit Affair: वरळीतील बीडीडी वसाहतीत मंत्री पकंजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृतदेह आढळला. कुटुंबियांचा अंनत गर्जेंवर गंभीर आरोप.

Bhagyashree Kamble

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वरळीच्या बीडीडी वसाहतीतील घरात त्यांनी आयुष्याचा दोर कापला. पतीचे इतर महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध उघड होताच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या कुटुंबियांनी लेकीच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला आहे. आत्महत्या नसून हत्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी अनंत यांच्यावर गुन्हा दाखल करून वरळी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान, डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्यासोबत शनिवारी नेमकं काय घडलं? आत्महत्या करण्यापूर्वी त्या कुठे होत्या? याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत आणि डॉ. गौरी यांचं लग्न फेब्रुवारी महिन्यांत झाले होते. लग्न झाल्यानंतर दोघेही बीडीडी वसाहतीत राहत होते. या प्रकरणी डॉ. गौरी यांचे वडील अशोक पालवे यांनी सांगितले की, 'अनंत यांनी शनिवारी सायंकाळी फोन केला होता. गौरी आत्महत्या करायला निघाली आहे, तिला समजवून सांगा', अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, नंतर अशोक पालवे यांना लेकीच्या आत्महत्येची माहिती मिळाली.

आत्महत्येचं नेमकं कारण काय?

लग्नाच्या काही दिवसानंतर डॉ. गौरी यांना काही कागदपत्रे सापडली. ही कागदपत्रे लातूर येथील रूग्णालयातील होती. त्यात गर्भवती महिलेचं नाव होतं. पती म्हणून अनंत यांचं नाव होतं. या कागदपत्रावरून दोघांचे आधीच लग्न झाले होते का? दोघांचे प्रेमसंबंध होते का? असा सवाल डॉ. गौरी यांच्या मनात आला. संबंधित महिलेबाबत डॉ. गौरी यांनी पतीला जाब विचारला. तेव्हा अनंत यांनी पत्नी धमकावले, अशी माहिती अशोक पालवे यांनी दिली.

आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. गौरी कुठे होत्या?

केईएम रूग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, केईम रूग्णालयात डॉ. गौरी दंत चिकित्सा विभागामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी त्या ड्युटीवर गेल्या. सहकाऱ्याचे लग्न जवळ आले आहे, यासाठी डॉ. गौरी यांनी खास कार्यक्रमासाठी नृत्याचा सराव केला. त्यानंतर डॉ. गौरी वेळेत घरी पोहोचल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric geyser explosion: इलेक्ट्रिक गिझर फुटण्यापूर्वी हे संकेत मिळतात

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

Wednesday Horoscope : मानसिक ताण वाढणार, अपशब्द वापरणे टाळावे; ५ राशींच्या लोकांनी पार्टनरला चुकूनही दुखवू नका

BJP- Congress Alliance: मोठी बातमी! भाजप आणि काँग्रेसची युती; अंबरनाथमधील नवं राजकीय समीकरण

Chocolate Coffee Recipe: कॉफी प्यायला आवडते? मग एकदा घरच्या घरी ट्राय करा टेस्टी आणि रिफ्रेशिंग चॉकलेट कॉफी

SCROLL FOR NEXT