Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: प्लॅटफॉर्मवर बसून पाहत होता पॉर्न व्हिडीओ, महिलेने तरुणाला धडा शिकवला; पाहा VIDEO

Borivali Railway Station: रेल्वे स्थानकावर महिलेच्या शेजारी बसून तरुण पॉर्न व्हिडीओ पाहत होता. आवाज आल्याने महिलेची नजर त्याच्याकडे गेली. या महिलेने या तरुणाला जाब विचारत शिवीगाळ केली आणि चांगलाच धडा शिकवला.

Priya More

Summary -

  • रेल्वे स्टेशनवर बसून तरुण पॉर्न व्हिडीओ पाहत होता

  • मुंबईच्या बोरीवली स्टेशनवरील ही घटना आहे

  • महिलेच्या शेजारी बसून हा तरुण व्हिडीओ बघत होता

  • या तरुणाला महिलेने चांगलाच धडा शिकवला

रेल्वे स्थानकावर बसून पॉर्न व्हिडीओ पाहणाऱ्या तरुणाला महिलेने चांगलाच धडा शिकवला. महिला प्रवाशाच्या शेजारी बसून तरुण पॉर्न व्हिडीओ पाहत होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मुंबईतील बोरीवली रेल्वे स्थानकावरील आहे. या व्हायरल व्हिडीओवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल होणारा व्हिडिओ बोरिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवरील आहे. निळ्या रंगाचा शर्ट आणि जांभळ्या रंगाची पँट घातलेला तरुण प्लॅटफॉर्मवरील कट्ट्यावर बसलेला दिसत आहे. हा तरुण एका महिलेशेजारी बसून मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडीओ पाहतो. हे पाहून संतप्त झालेली महिला त्याला काय पाहतो असे विचारते. त्यावर तो तरुण तिला म्हणतो 'कोण काय बघतंय?, कोणाकडे बघतोय?', असे म्हणत तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो.

संतप्त झालेली महिला तरुणाला म्हणते 'खुल्लमखु्ला पॉर्न बघतोय. हे कुणाला दाखवत आहेतस रे तू. हे माझ्या बाजूला बसून तू का बघत आहेस? असे संतप्त सवाल करते. यावेळी ती तरुणाला शिवीगाळ करते. महिलेचा रौद्रावतार पाहून तरुण घाबरतो आणि तो मोबाईल आणि बॅग घेऊन तिथून पळ काढतो. महिलेने आपल्या मोबाईलमध्ये या तरुणाचे हे कृत्य कैद करते. हा व्हिडीओ सध्या चांगालचा व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत तरुणाला चोप द्यायचा होता ना असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, 'चुकीचं आहे असं सार्वजनिक ठिकाणी पॉर्न बघणं. कदाचित त्याचं आजूबाजूला लक्ष नसावं असं वाटतंय.' तर दुसरा नेटकरी म्हणतो की, 'पकडून त्याला चोपायचं होतं ना.' तर आणखी एक नेटकरी म्हणाला की, 'असे मानसिक रोगी आपल्या आजूबाजूला असतात.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राळेगाव तालुक्यात आदिवासी समाजातील 34 मुली गायब; भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांचा गंभीर आरोप

Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका विश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

Aamba Kalakand Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंबा कलाकंद रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

EPFO KYC Update: KYC शिवाय PFचे पैसे मिळणार नाहीत, वाचा ऑनलाइन प्रोसेस

Crime News: दहा वर्षांचं प्रेम, मुलीचा मात्र लग्नाला नकार; अलिबागमध्ये तरूणाची आत्महत्या, मृतदेहाजवळ फोटो सापडल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT