Mumbai Water Supply Shortage News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Cut : मुंबईवर ८७ तास पाणीसंकट! 'या' भागांतला पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Supply Shortage News : मुंबईत दादर, अंधेरी पूर्व आणि सांताक्रूझ पूर्व भागात २२ ते २६ डिसेंबरदरम्यान ८७ तास पाणी कपात करण्यात येणार आहे. जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईत २२ ते २६ डिसेंबरदरम्यान ८७ तास पाणी कपात

  • दादर, अंधेरी पूर्व, सांताक्रूझ पूर्व भाग प्रभावित

  • जलवाहिनी जोडणी व मेट्रो प्रकल्पामुळे काम

  • नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुढील ८७ तास मुंबईवर पाणी कपातीचं संकट ओढवलं आहे. दादर ,अंधेरी पूर्व ,सांताक्रूझ पूर्व या विभागातील विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कारणास्तव सोमवारी दि. २२ डिसेंबर ते शुक्रवारी दि २६ डिसेंबर पर्यंत ही पाणी कपात असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

मुंबईत येत्या सोमवारपासून ८७ तासांसाठी पाणी कपात करण्यात येणार आहे. दादर , अंधेरी पूर्व , सांताक्रूझ पूर्व या विभागातील विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीचे काम दि २२ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून दि २६ डिसेंबर मध्‍यरात्रीनंतर १ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, दादर, अंधेरी पूर्व, सांताक्रूझ पूर्व या विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच, नियमित पाणीपुरवठ्याच्‍या वेळेत देखील बदल होणार आहे.

एमएमआरडीएच्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी २४०० मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद जोडणीचे काम पालिकेमार्फत करण्यात येणार आहे. ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची असून नियोजनबद्ध पद्धतीने व तांत्रिक निकषांचे पालन करून करण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांना पाणीपुरवठ्यात कमीतकमी अडथळा येईल, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.

दादर मधील 'या' ठिकाणी पाणी बंद राहणार

धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, धारावी सकाळचा पाणीपुरवठा - जस्मिन मील मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, ६० फूट मार्ग, ९० फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर ढोरवाडा, महात्मा गांधी मार्ग या भागात कामाच्या कालावधीत दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल तसेच धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मिन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर या भागात कामाच्या कालावधीत ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा,होईल.

अंधेरीतील 'या' भागात पाणी कपात

कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत या विभागात कामाच्या वेळेत दररोज दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल तसेच कोलडोंगरी, जुनी पोलीस गल्ली, विजय नगर (सहार रस्ता) मोगरापाडा कामाच्या कालावधीत दररोज सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

सांताक्रूझमधील 'या' भागात पाणी कपात

बीकेसी मधील मोतिलाल नगर भागातही सोमवार पासून शुक्रवार पर्यंत दररोज रात्री १०.०० ते रात्री ११.४० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच प्रभात वसाहत, टीपीस-३, आग्रीपाडा, कलिना, सीएसटी मार्ग, हंसभुग्रा मार्ग, विद्यापीठ, सीएसटी मार्गाची दक्षिण बाजू, यशवंत नगर, सुंदर नगर, कोलिवरी गाव, तीन बंगला, शांतिलाल कंपाऊंड, पटेल कंपाऊंड, गोळीबार मार्ग, खार भुयारी मार्ग (सब वे) ते खेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, ए. के. मार्ग, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) या विभागात कामाच्या कालावधीत दररोज मध्यरात्री ३.३० नंतर ते सकाळी ९.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Elections : राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरावर दगडफेक, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

National Youth Day 2026: तरुणांनो यश मिळवणं कठीण वाटतं? स्वामी विवेकानंदांचे 'हे' 4 विचार एकदा वाचाच, सगळी कोडी सुटतील

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

SCROLL FOR NEXT