Mumbai Water Supply
Mumbai Water Supply Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Water Supply : पाणी जपून वापरा! मुंबईसह अमरावतीमधील 'या' भागांत २ दिवस पाणीपुरवठा बंद

Ruchika Jadhav

मुंबईतील धारावीसह अन्य आसपासच्या भागांत दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. १८ आणि १९ एप्रिल रोजी या परिसरात पाणी येणार नाहीये. त्यामुळे त्याआधीच नागरिकांनी पिण्यासाठी जास्तीचे पाणी भरून ठेवावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाकडून नवरंग कम्पाउंड येथे अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी जोडण्याचे काम केले जाणार आहे.

२४०० मिली मीटर व्यासाची ही जलवाहिनी जोडण्याचे काम १८ एप्रिलपासून सुरू होईल. त्यामुळे १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १९ एप्रिल पहाटे ४ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे.

एकूण कालावधीमध्ये काही भागात १०० टक्के, तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या परिसरात १०० टक्के पाणीपुरवठा बंद

१. एच पूर्व विभाग - वांद्रे रेल्वे टर्मिनस आणि वांद्रे स्थानक परिसरात १८ आणि १९ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहिल.

२. जी उत्तर - धारावी लूप मार्ग, नाईक नगर, प्रेम नगर येथे १८ एप्रिल रोजी सकाळचा पाणीपुरवठा बंद असेल.

३. जी उत्तर - धारावी लूप मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक मार्ग येथे १८ एप्रिल रोजी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या परिसरात २५ टक्के पाणीपुरवठा बंद

जी उत्तर- ६० फुटी रोड, ९० फुटी रोड, शीव-माहीम लिंक रोड, ए. के. जी. नगर, एम. पी. नगर, महात्मा गांधी मार्ग आणि संत कक्कया मार्ग या परिसरांमध्ये १८ एप्रिल रोजी २५ टक्के पाणीपुरवठा बंद आहे.

अमरावतीमध्ये देखील १८ आणि १९ एप्रिलला पाणीपुरवठा बंद राहणार

१८ आणि १९ एप्रिल रोजी म्हणजे दोन दिवस अमरावती आणि बडनेरा शहराला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइनमधून पाणी गळती होत असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी पुरवठा बंद राहणार आहे.

दोन दिवस दुरुस्तीचे काम चालणार असल्याने शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adah Sharma : ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा हिच्या हटके अदा; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Ghatkopar Hoarding Collapse Case: मोठी अपडेट! उदयपूरमधून भावेश भिडेला अटक

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला मुंबई पोलिसांनी उदयपूरमधून केली अटक

Malegaon News: क्षुल्लक भांडणावरून ८ वर्षांच्या चिमुकलीची हत्या, आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

OTT Released This Week : ‘द नक्सल स्टोरी’ ते ‘मडगांव एक्सप्रेस’, OTT वर मनोरंजनचा धमाका; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT