Water Supply In Mumbai: The Dam Water Level In Mumbai Decreased So Water Storage Will Be Available Till 15th July Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Level: मु्ंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार; धरणांतील साठ्यात मोठी घट, १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा

Water Cut in Mumbai: वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण धरण साठ्यात मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे.

Rohini Gudaghe

ऐन पावसाळाच्या तोंडावर मुंबईकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याच्या पातळीमध्ये घट होत असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण धरण साठ्यात मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये १८ मे रोजी फक्त १ लाख ७६ हजार ०२६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

मुंबईला मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, भातसा, (Mumbai Water Cut) तानसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांतून दररोज ३९५० दशलक्ष इतका लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची गरज भागविण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. परंतु मागील वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईकरांना पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे.

परंतु मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपात रद्द केली गेली होती. आता या सातही धरणांमध्ये १२.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध (Mumbai Water Storage) आहे. राज्य सरकारने मुंबईकरांना २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केला आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान १५ भागेल, इतका पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. परंतु जून महिन्यात पावसाने हजेरी लावली नाही, तर मात्र मुंबईकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो, अशी माहिती बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

१८ मे रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा (Mumbai Water Storage Update) किती होता, ते जाणून घेऊ या. अप्पर वैतरणा धरणामध्ये ११,७३० दशलक्ष लिटर, मोडक सागर धरणामध्ये २४,८९५ दशलक्ष लिटर, तानसा धरणामध्ये ४४,४०९ दशलक्ष लिटर, (Mumbai News) मध्य वैतरणा धरणामध्ये २१,०१२ दशलक्ष लिटर, भातसा धरणामध्ये ६४,२५८ दशलक्ष लिटर, विहार धरणामध्ये ७,१२७ दशलक्ष लिटर आणि तुळशी धरणामध्ये २,५९५ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

SCROLL FOR NEXT