Mumbai Water Problem Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Water Problem: मुंबईतील 'या' भागात ९ जानेवारीला कमी दाबाने पाणी पुरवठा, काही दिवस पाणी गढूळ येण्याची शक्यता

Mumbai Water Problem News: बोरिवली टेकडी जलाशयाचे संरचनात्मक तपासणीचे काम ९ जानेवारी रोजी दुपारी १ ते रात्री ९ दरम्यान होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य, आर दक्षिण, आर उत्तर विभागातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Sandeep Gawade

Mumbai Water Problem

बोरिवली टेकडी जलाशयाचे संरचनात्मक तपासणीचे काम ९ जानेवारी रोजी दुपारी १ ते रात्री ९ दरम्यान होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य, आर दक्षिण, आर उत्तर विभागातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, पाणी जपून वापरावं. तसेच त्यानंतर पुढील दोन दिवस पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर / मध्य विभागातील बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य स्थित, बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक ०२ ची संरचनात्मक तपासणी (Structural Audit) मंगळवार, दिनांक ०९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत (एकूण आठ तास) होणार आहे. सदर कामादरम्यान, बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक २ रिक्त करण्यात येणार आहे. आर / दक्षिण, आर / मध्य व आर / उत्तर या विभागात पाणीपुरवठा हा फक्त बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक ३ द्वारे करण्यात येणार आहे.

या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

१) आर / दक्षिण -

महिंद्रा आणि महिंद्रा, गुंदेचा ठाकूर गांव व समता नगर-सरोवा संकुल, कांदिवली (पूर्व). (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५)

२) आर / मध्य -

ला-बेल्लेजा व ला-वेस्टा, बोरिवली (पूर्व). (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७.३०)

३) आर / उत्तर –

शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एन. जी. उद्यान, रिव्हर उद्यान, गावडे नगर, भोईर नगर, मिनी नगर, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, ज्ञानेश्वर नगर, कोकणीपाडा, संत नामदेव मार्ग, वाघदेवी नगर, केशव नगर, राधाकृष्ण नगर, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, मेंदोडा कुंपण, भोईर कुंपण, सिद्धनाथ मिश्रा कुंपण, संत मीराबाई मार्ग, राज नगर, सुयोग नगर, वैशाली नगर, नरेंद्र संकुल, केतकीपाडा (अंशत:), एकता नगर, दहिसर टेलिफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, गणेश मंदीर मार्ग, अष्टविनायक चाळ, दहिसर (पूर्व). (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.४० ते सायंकाळी ७.४०)

४) आर / उत्तर –

आनंद नगर, आशीष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, भाबलीपाडा, पराग नगर, लिंक मार्ग, गोवण मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुधींद्र नगर, देवयानी संकुल, महालक्ष्मी आणि सरस्वती संकुल, शक्ति नगर, सद्गुरू छाया लेऊट बंगाली पाडा, महाकाली वाडी, मातृछाया गल्ली, दहिसर भूयारी मार्ग, आनंद नगर (अंशत:), तरे कुंपण, अवधूत नगर, वर्धमान औद्योगिक परिसर, सी. एस. मार्ग, दहिसर पोलिस स्थानक परिसर, किसान नगर, वर्धमान औद्यगिक परिसर, डायमंड इंडस्ट्री, नॅशनल मील कुंपण, रामाणी कुंपण, केतकीपाडा ऑनलाईन पंपिंग, दहिसर (पूर्व). (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.४५ ते रात्री ११.३०)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यातील पाऊस झाला कमी, विदर्भाला येलो अलर्ट

Crime News : दुचाकीवरून आले, तरुणीला उचलून नेलं अन्...; धक्कादायक कारण आलं समोर, घटनेचा VIDEO व्हायरल

लालपरीतून ओलाचिंब प्रवास; बसमध्येच पावसाचं पाणी गळायला लागल्याने चालकावर प्रवाशांने धरली छत्री

Tariff: वस्त्रोद्योग, हिरे, दागिने अन् बरंच काही; टॅरिफचा भारताला बसणार फटका; या क्षेत्रांवर होणार परिणाम

Liver Kidney Detox : यकृत अन् मूत्रपिंड डिटॉक्स करायचेय? ८ फळांचा रोजच्या आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT