Pune Water Problem
Pune Water ProblemSaam Digital

Pune Water Problem: पुण्यातील 'या' भागात तब्बल १५ दिवस एकवेळ पाणीपुरवठा, काय आहे कारण? जाणून घ्या

Pune Water Problem News: पर्वती येथील एमएलआर टाकी वरून ते जगताप हाऊस दरम्यान नव्याने टाकलेल्या ८ जानेवारी ते २२ जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भवानी पेठ, स्वारगेट परिसरात एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
Published on

Pune Water Problem

जलवाहिनीच्या दुरुतीसाठी भवानी पेठ, स्वारगेट परिसरात ८ जानेवारी ते २२ एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पर्वती येथील एमएलआर टाकी वरून ते जगताप हाऊस दरम्यान नव्याने टाकलेल्या ८ जानेवारी ते २२ जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. भवानी पेठ स्वारगेट परिसर शंकर शेठ रस्ता या परिसरात दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे. या भागासाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था८०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून करण्यात आली आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.

या भागात एक वेळ पाणी पुरवठा

स्वारगेट पोलीस वसाहत, झगडेवाडी, खडकमाळ आळी, संपूर्ण घोरपडी पेठ, मोमिनपुरा, टिंबर मार्केट, महात्मा फुले पेठ, गंजपेठ, गुरुवार पेठ, धोबी घाट, खडक पोलीस वसाहत, लोहिया नगर, इनामकेमळा, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, काशिवाडी, गुरुनानकनगर, नेहरू रस्ता, संपूर्ण भवानी पेठ परिसर, बालाजी व भवानी माता मंदिर परिसर,नवीन नाना पेठ, हरकानगर, चुडामण तालीम इत्यादी भागभगवान दास चाळ, वायमेकर चाळ, राजेवाडी, पत्राचाळ एसआरए, भवानी पेठ पोलीस वसाहत

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Water Problem
Success Story Of Slum Girl: पायलट व्हायचे होते पण आर्थिक परिस्थिती नव्हती; पायलट झोयाच्या मदतीनं मुंबईच्या 'स्लम गर्ल'ची स्वप्नभरारी!

सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, पद्मजी सोसायटी परिसर, महीफिल वाडा, साठेवाडा, रमेश फर्निचर परिसर, सायकल सोसायटी, मुकुंदनगर, व्हेईकल डेपो, अप्सरा टॉकीज परिसर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, सीपीएडबल्यू क्वार्टर, रांका हॉस्पिटल परिसर, शंकरशेठ रस्ता एसटी बस स्थानक ते धोबी घाट परिसर उजवी बाजू, मीरा सोसायटी, लक्ष्मी नारायण चौकीच्या मागील वस्ती, मित्र मंडळ कॉलनी.

Pune Water Problem
Pune News: कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात होणार वाढ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्ताव तयार करण्याचे दिले आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com