MUMBAI WATER METRO CANDELA P-12 ARRIVAL TRAFFIC SOLUTION Saam Tv
मुंबई/पुणे

Water Metro : मुंबईकरांसाठी खुशखबर! पहिली वॉटर मेट्रो २५ मे रोजी बंदरात दाखल होणार; वाचा A to Z माहिती

Mumbai Water Metro News : मुंबईत वॉटर मेट्रो ‘कॅन्डेला P-12’ २५ मे रोजी दाखल होणार असून जूनपासून चाचण्या सुरू होणार आहेत. पर्यावरणपूरक आणि जलद प्रवासाचा नवा पर्याय मुंबईकरांना मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई वॉटर टॅक्सी ‘कॅन्डेला P-12’ २५ मे रोजी मुंबईत दाखल होणार

  • जूनपासून वॉटर मेट्रो चाचण्या सुरू होणार

  • ३० प्रवासी क्षमता असलेली इलेक्ट्रिक फेरी

  • ट्राफिक कमी करून पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता रस्त्यावरचं ट्राफिक होणार गुल, कारण येत्या २५ मे रोजी मुंबई बंदरात वॉटर मेट्रो ‘कॅन्डेला P-12’ दाखल होणार आहे. या मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना आरामदायी प्रवास करायला भेटणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे. या घडामोडीमुळे मुंबई वॉटर मेट्रोच्या चाचण्यांना लवकरच सुरुवात होणार असून, प्रत्यक्ष सेवेला हिरवा कंदील मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्राच्या तब्बल ८७७ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीला आधुनिक जलवाहतुकीद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा राज्य सरकारने हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत वॉटर मेट्रो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहे. मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या इलेक्ट्रिक बोटीची चाचणी सुरू होईल. यशस्वी चाचण्यांनंतर मुंबईकरांना जलमार्गाने प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

सध्या चाचणीसाठी येणारी ‘कॅन्डेला P-12’ ही ३० प्रवाशांची क्षमता असलेली अत्याधुनिक इलेक्ट्रिक फेरी आहे. राज्य सरकारकडून पुढील टप्प्यात ५० आणि १०० प्रवासी क्षमतेच्या बोटींसाठीही नॉर्वेतील कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे आणि वेळेचा अपव्यय या समस्यांवर जलवाहतूक हा प्रभावी पर्याय ठरू शकतो.

विशेष म्हणजे, ही नवीन वॉटर मेट्रो डिझेल बोटींपेक्षा तब्बल ८० टक्के कमी इंधन वापरते आणि शून्य कार्बन उत्सर्जन करते. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. ‘कॅन्डेला P-12’ ही वॉटर मेट्रो सुमारे ४६ किमी प्रतितास वेगाने धावते. एकंदरीत, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

Maharashtra News Live Update: ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT