Shruti Vilas Kadam
पावसाळ्यात पाण्यात आणि अन्नामध्ये जंतू वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
रस्त्यावरील उघड्यावर मिळणारे अन्न किंवा कापलेली फळे खाल्ल्याने संसर्गाचा धोका वाढतो. शक्यतो ताजे आणि घरचे अन्नच खा.
पोटाचे आजार टाळण्यासाठी नेहमी उकळून थंड केलेले किंवा शुद्ध केलेले पाणी पिण्याची सवय लावा.
अपचन, गॅस किंवा मळमळ होत असल्यास आल्याचा चहा किंवा भाजलेल्या जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.
दही आणि ताकातील चांगले बॅक्टेरिया पचन सुधारण्यास मदत करतात आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवतात.
जेवणापूर्वी आणि शौचालयातून आल्यानंतर साबणाने हात धुतल्यास जंतूंपासून संरक्षण मिळते.
वारंवार उलट्या, अतिसार, ताप किंवा शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.