Shruti Vilas Kadam
१ टेबलस्पून तेल, १ टीस्पून बारीक चिरलेले लसूण, १ टीस्पून आले, गाजर, कोबी, फ्रेंच बीन्स, ४ कप व्हेजिटेबल स्टॉक, कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ आणि मिरीपूड घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात लसूण आणि आले परता. त्यानंतर चिरलेल्या भाज्या घालून २ ते ३ मिनिटे हलक्या आचेवर परतून घ्या.
भाज्या थोड्या मऊ झाल्यानंतर त्यात व्हेजिटेबल स्टॉक घाला. मिश्रण ८ ते १० मिनिटे मध्यम आचेवर उकळू द्या.
सूपमध्ये मीठ आणि काळी मिरीपूड घालून व्यवस्थित ढवळा. यामुळे सूपची चव अधिक खुलते.
गॅस बंद केल्यानंतर ताज्या लिंबाचा रस घाला. उकळत्या सूपमध्ये लिंबाचा रस घालू नका, त्यामुळे त्याचा ताजेपणा टिकून राहतो.
बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर सूपमध्ये घाला. यामुळे सूपला ताजातवाना सुगंध आणि छान फ्लेवर मिळतो.
तयार लेमन कोरिअँडर सूप गरमागरम बाऊलमध्ये वाढा. त्यासोबत टोस्टेड ब्रेड किंवा गार्लिक ब्रेड दिल्यास त्याची चव अधिकच खुलते.