Mumbai Dam Water Level Status Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Water Dam Status: मुंबईकरांना पाणीदिलासा केव्हा मिळणार? शहराला पुरवठा करणाऱ्या ७ धरणात किती पाणीसाठा? समोर आली महत्वाची माहिती

Mumbai Water Dam Status: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे.

Vishal Gangurde

Mumbai Water Dam Status:

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तलाव क्षेत्रातही पाऊस पडला नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा ८५ टक्क्यांवर स्थिरावला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या काही तलाव ओव्हर फ्लो झाले आहत. यामध्ये प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो झालेला नाही. दरवर्षी १ ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची तारीख असते. या दिवशी सर्व तलावांमधील जलसाठा १०० टक्के असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही बाब समाधानकारक मानण्यात येते.

सर्व तलावांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. तलावांमधून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या या तलावांमध्ये एकूण १२ लाख ३९ हजार ५४१ दशलक्ष लिटर इतका साठा आहे. (Dam Levels In Mumbai Today)

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १ जुलैपासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. ९ ऑगस्टला पाणीसाठा ८१ टक्के असल्याने ही कपात मागे घेतली. पाणी कपात मागे घेतल्यानंतरही मुंबईत पाऊस पडलेला नाही, गेल्या १५ दिवसांत तर तलावातील जलसाठ्यात अवघ्या ५ टक्क्यांनीच वाढ झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील पाण्याचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व धरणांमधील पाण्यावर पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील पाणी आणि पावसाचा आढावा घेतला. तसेच चाऱ्याच्या बाबतीत पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सखोल माहिती राज्य सरकारने घेतली.

'यासंदर्भात विभागीय बैठका घेतल्या जाणार आणि तात्काळ परिस्थितीनुरुप आदेश दिले जाणाकर आहेत. दुष्काळ जाहीर होण्यासारखी आज परिस्थिती नाही, दुष्काळ येवू नये अशी भगवंताकडे प्रार्थना करतो. राज्यातील संपूर्ण पाणी साठ्याबाबत धरणाच्या पाण्यातील आरक्षण पिण्यासाठी आणि शेतीसाठी काय करावे , याकरिता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांची पिके वाचवण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT